गुरुवार, १८ एप्रिल, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" त्याग ही सत्याची गुरुकिल्ली आहे."

प्रकरण सहा

सतीत्व 

            १४) एकदा कोडाईकॅनालमध्ये असताना स्वामींनी रामायणातील काही प्रसंग सांगितले ते म्हणाले की जेव्हा हनुमानाला सीतामाई सापडली तेव्हा तो म्हणाला, " या माझ्या खांद्यावर बसा. मी तुम्हाला रामाकडे घेऊन जातो. " त्यावर सीतामाई उत्तरली," ह्याने माझे पातिव्रत्य भंग पावेल, मी येणार नाही. " या सत्संगानंतर सगळ्यांनी गमतीने मला विचारले, " जर हनुमानाने तुम्हाला असे विचारले असते तर तुम्ही काय उत्तर दिले असते  ?" मी म्हणाले, " हनुमानाने जरी मला उचलून घेऊन स्वामींकडे नेलं काय किंवा मला गिळंकृत करून स्वामींपुढे उलटी करून बाहेर काढले काय, मला सर्व मान्य  आहे. स्वामींकडे जाणं मुद्याचं आहे. कशाप्रकारे जाऊन पोहोचते याला महत्व नाही." कोणी यावर म्हणेल " हे उचित आहे का ?आधी तर तुम्ही म्हणालात की कोणीही तुम्हाला स्पर्श करता काम नये आणि आता तुम्ही म्हणता की खांद्यावरून नेलं काय किंवा गिळलं काय, तुम्हाला त्याची चिंता नाही. हे कसे काय ? " 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा