ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" देहभाव गळून पडल्यावर सत्याचा साक्षात्कार होतो."
प्रकरण सहा
सतीत्व
स्वामींनी मला विचारले, " तू सीतेप्रमाणे बोलशील का ? राधेने कृष्णाला आपल्या चरणांची धूळ दिली तशी तू देशील का ? तुला हे जमेल का ? "
माझे नाव इतरांबरोबर जोडलेले मला आवडत नाही. एवढेच नाही तर माझे नाव कृष्ण किंवा प्रेम साईंबरोबर जोडलेलेही मला आवडत नाही. या जन्मात मी फक्त स्वामींची आहे. जगातील सर्वजण माझी मुले व्हावीत. या एकाच उद्देशाने मी जन्म घेतला आहे. मी समस्त सृष्टीची माता आहे. सर्वजण मला ' अम्मा ' म्हणून बोलावतात. स्त्री, पुरुष, तरुण मुलं मुली सगळे मला ' अम्मा ' म्हणतात सर्वांमध्ये हा भाव स्वाभाविकपणे उपजतो. त्याचप्रमाणे मी राधेसारखे माझ्या चरणांची धूळ देऊ शकत नाही. पतीच्या तुलनेत पत्नी नेहमी दुय्यम स्तरावर असली पाहिजे. मी स्वामींना विचारेल, " तुम्हाला यातील कोणते प्रकरण सर्वात जास्त आवडले ?" त्यांनी लिहिले की सीता आणि राधा. माझे नाव फक्त स्वामींशीच जोडेल जायला हवे म्हणून स्वामींनी ' ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः ' हा मंत्र दिला. पहिल्यांदाच शिव आणि शक्ती दोघांची नावे एका मंत्रामध्ये जोडली गेली आहेत.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा