ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराची निर्मिती परस्परावलंबी आहे. निर्मितीत समतोल राखण्यासाठी आपण वापरात असलेल्या प्रत्येक गोष्टीची परतफेड केली पाहिजे ."
सूत्र पाचवे
कृतज्ञता
वसंता - स्वामी, राजकुमारांनी मला तुमचा आवाज ऐकवून अतीव आनंद दिला. मला त्यांना काहीतरी द्यायचं आहे.
स्वामी - तू अगोदरच त्यांना एक कविता आणि काही भेटवस्तू दिल्या आहेत ना, मग अजून तू काय देऊ इच्छितेस ?
वसंता - स्वामी, तेवढे पुरेसे नाही. मला याहून अधिक द्यायचे आहे. मला स्वतःलाच त्यांना द्यायचे आहे.
स्वामी - बरं, बरं ! रडू नकोस.
वसंता - स्वामी, नेहाच्या कुटुंबाला आपल्याविषयी केवढे प्रेम, जिव्हाळा आणि श्रद्धा आहे. मी त्यांना खूप गोष्टी दिल्या आहेत, परंतु तेवढे पुरेसे नाही. मला स्वतःलाच त्यांना द्यायचे आहे. प्रमिला आणि अय्यरही माझ्यावर किती प्रेम करतात. मी जे काही देते त्याने माझे समाधान होत नाही. मी स्वतःलाच त्यांना द्यायला हवे. निकोलाही माझ्यासाठी किती रडते ?
स्वामी - जर तू सगळ्यांना वाटून दिलेस तर माझ्यासाठी काय शिल्लक राहणार ?
वसंता - हो, स्वामी, मला तुमच्या चरणांशी पूर्णपणे समर्पित व्हायचे आहे. मी अशी का बरं आहे ? माझ्या मनात असे भाव का येतात ? मला काही समजत नाही. मला हे सहनही होत नाही. मी स्वतःलाच सर्वांना द्यावे असे मला वाटते ; का बरं ?
स्वामी - रडू नकोस, हे वसंतमयम आहे. सर्वांतर्यामी अशा मलाच तू स्वतः अर्पण व्हावंस अशी तुझी इच्छा असते.
ध्यान समाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा