ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" खऱ्या प्रेमाला देह अथवा विवाहाची आवश्यकता नसते केवळ भावना पुरेशा असतात. "
सूत्र पाचवे
कृतज्ञता
दुपारचे ध्यान
वसंता - स्वामी मला स्वतःस सर्वांना द्यावेसे का वाटते ?
स्वामी - प्रथम तू अनेक भेटवस्तू दिल्यास. त्याने तुझे समाधान झाले नाही. नंतर तू तुझे भाव ओतून व्यक्त करणाऱ्या कविता लिहिल्यास, त्यानेही तुझे समाधान झाले नाही. मग तू मला माझे भाव त्या कवितेमध्ये अंतर्भूत करण्यास सांगितले. तरीही तू असमाधानी राहिलीस. आता तुला स्वतःस सर्वांना द्यायचे आहे. तू पूर्णम आहेस.
वसंता - स्वामी, प्रथम तुम्ही अनेक चमत्कार दाखवलेत. त्यानंतर शक्ती, सिद्धी, अनेक पदे, अवतारपद सर्व काही मला देऊ केलेत. परंतु तुम्ही स्वतःस मला पूर्णपणे देऊ केले नाही.
स्वामी - मी नक्की करेन, त्यानंतरच तू तृप्त होशील. तुला इतरांबद्दल एवढी कृतज्ञता का वाढते ? तू या जगात प्रथमच जन्म घेतल्यामुळे. तू सगळ्यांमधले फक्त चांगले गुण घेतेस. तू सगळ्यांकडून जे जे काही शिकतेस त्याचे ऋण फेडण्यासाठी हे सर्व करतेस. तुझ्यामध्ये सर्व काही आहे परंतु तुला वाटते की, तू इतरांकडून ते शिकत आहेस. तुझ्या विनम्रतेतून आणि कृतज्ञतेतून तू संपूर्ण जगाला आदर्श जीवन कसे जगावे त्याचे प्रात्यक्षिक दाखवत आहेस.
ध्यानसमाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा