ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" नैसर्गिक साधनसंपत्तीविषयी मनुष्याला असणाऱ्या लालसेपोटी निसर्गाचा समतोल बिघडला आहे."
सूत्र पाचवे
कृतज्ञता
स्वामी सर्वांतर्यामी असल्यामुळे मी स्वतःस सर्वांना देऊन टाकावे असे मला वाटत राहाते. स्वामींनी सांगितले, प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये असणाऱ्या ' त्याला ' मी मला द्यावे अशी माझी इच्छा आहे. रिकाम्या हिंगाच्या डबीला जसा हिंगाचा वास राहतो त्याचप्रमाणे जन्मानुजन्मं, युगानुयुगं साठवलेल्या वासनारूपी कचऱ्याच्या दुर्गंधीने सर्वजण भरून राहिले आहेत. मी एक पूर्ण रिक्त घट आहे. परमेश्वर हीच माझी एकमेव वासना आहे . मला या परमेश्वराच्या सुगंधाने सर्वांना भरून टाकायचे आहे . जेव्हा मी स्वतःला सर्वांमध्ये वाटून टाकते तेव्हा तो सुगंध सर्वांतर्यामी परमेश्वराशी पोहोचतो .
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा