ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रेमाला लज्जा माहीत नाही. कोणतीही गोष्ट प्रेमाला नियंत्रित करू शकत नाही. ते कोणावरही अवलंबून नाही ते सदा मुक्त असते."
सूत्र चौथे
प्रेमाची सखोलता
एका बाजूला मला अवतारपद, लक्ष्मीपद पार्वतीपद प्राप्त झाले आहे. मी म्हणते," मला यांपैकी काही नको. मला फक्त स्वामी हवेत." या प्रेमाने ही सर्व पदे दूर सारली. दुसऱ्या बाजूला, जर स्वामी राक्षस, अळी वा मनुष्य झाले तर मला फक्त ते हवेत. स्वतःची अवस्था अथवा स्वामींची अवस्था या प्रेमाच्या खिजगणतीतही नाही. एकदा स्वामींनी मला विचारले," तू स्वतःचा देह तरुण, अक्षत, सुंदर आणि परिपूर्ण बनवू इछितेस मग मी तुला कसा काय शोभेन ? मी नव्वद वर्षांचा आणि तू वीस वर्षांची तर ते साजेसं दिसेल का ?
त्यावर मी उत्तरले," तुमचे वय कितीही असो; तुमचे रूप कसेही असो, जसे आहे तसे माझ्या दृष्टीने ठीक आहे. त्यामध्ये काहीही बदल घडू नये असे मला वाटते. मला माझा देह तुम्हाला समर्पित करायचा आहे. हे शरीर निवेदन असल्यामुळे मी हे शरीर तरुण सुंदर, अक्षत आणि परिपूर्ण करूनच ' शरीर निवेदन ' करायला हवं."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा