ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वर ना नर आहे ना नारी, वास्तविक त्याला लिंग नाही."
सूत्र चौथे
प्रेमाची सखोलता
२९ जून २००८ ध्यान
वसंता - स्वामी, तुम्ही प्रेमसूत्राविषयी काही सांगा ना.
स्वामी - प्रेमाची अभिव्यक्ती दोन व्यक्तींमध्ये होते. तू केवळ तुझ्या प्रेमाविषयीच का लिहिलेस ? माझ्या प्रेमाचे काय ?
वसंता - स्वामी, तुमच्या प्रेमाविषयी केवळ तुम्हालाच माहिती ! मी कशी काय लिहू शकेन ?
स्वामी - तू म्हणजे मी. मी जेव्हा तुझा विचार करतो तेव्हा तुझ्या प्रेमाने तू मला व्यापून टाकतेस. जेव्हा मी तुझी पत्रे वाचतो तेव्हा तू रूप धारण करतेस.
वसंता - आता मला समजले. स्वामी, माझ्या डोळ्यात अश्रू आले की तुमच्याही डोळ्यात अश्रू येतात.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा