गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" सर्वांवर प्रेम करा ..... हा तुमचा मंत्र बनवा."

सूत्र सातवे 

वेग 

           स्वामींनी सांगितल्यानुसार अनेक महात्म्यांनी ध्यानामधून उच्च ज्ञान प्राप्त केले आहे. उपनिषदे, पुराणे आणि महाकाव्ये याच पद्धतीने लिहिली गेली आहेत. जगाने त्याचा आहे तसा स्वीकार करून लाभ मिळवला. त्या महात्म्यांच्या मनात कोणताही किंतु नव्हता. ते असं म्हणाले नाहीत," जर परमेश्वराने स्वतः येऊन सांगितले तरच मी विश्वास ठेवेन." महर्षी व्यासांनी मानवजातीवर केवढे उपकार केले आहेत. त्यांनी ब्रह्मसूत्र व महाभारत यांसारखे ग्रंथ लिहिले. म्हणून श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे, " मुनींमध्ये मी व्यास आहे." मानवजातीला त्यांनी एवढे प्रचंड ज्ञान दिले आहे की, त्यांना ' व्यास भगवान ' म्हणून संबोधतात. हे सर्व लेखन त्यांनी परमेश्वराशी ऐक्य साधल्यानंतरच्या अवस्थेमध्येच केले आहे म्हणून  त्यांना व्यास भगवान म्हटले जाते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
 
सुविचार 

    "  कोणालाही दुखवू नका कारण परमेश्वर प्रत्येकामध्ये विद्यमान आहे."

सूत्र सातवे 

वेग 

             माझे आणि स्वामींचे नाते काय आहे ? आम्ही येथे का आलो आहोत ? हे मी अनेक पुस्तकांमधून स्पष्ट केले आहे. आम्ही येथे प्रेमसंस्थापना करण्यासाठी आलो असल्यामुळे केवळ प्रेम हाच  माझ्या पुस्तकांचा  आशय आहे. लोक आमच्या  प्रेमाकडे भौतिक दृष्टिकोनातून पाहतात आणि द्वेषापोटी अफवा पसरवतात. राधा - कृष्णाच्या विशुद्ध प्रेमकडेही ते कामदृष्टीने पाहतात. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात  ...... 

जय साईराम 

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

       " परमेश्वराची शिकवण आचरणात आणली नाही तर त्याच्या दर्शनाचा काय उपयोग ?"

सूत्र सातवे

वेग

वसंता -  स्वामी, माझे प्रिय प्रभू,
स्वामी - मी सुद्धा तुझे प्रेम, तुझे अश्रू, तुझी तळमळ आणि तुझी निकटता अनुभवण्यासाठी व्याकुळ झालो आहे. मी इथे कशासाठी आलो आहे ? केवळ तुझे प्रेम अनुभवण्यासाठी. मला तुझे प्रेम अनुभवायचे आहे आणि जगासमोर आपले प्रेम प्रकट करायचे आहे. मी तुझ्या सान्निध्यासाठी आणि स्पर्शासाठी तळमळतो आहे.
अनेक महात्म्यांना ध्यानामधून उच्च ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी ते जगाला ज्ञात करून दिले. परमेश्वर स्वतः येऊन कधीही सांगत नाही, " तू जे लिहित आहेस ते बरोबर आहे."
व्यासांनी संकलन करून १८ पुराणे व ४ वेद यांमध्ये धर्मग्रंथ विभागित केले. त्यानंतर त्यांनी ब्रम्हसूत्र लिहिले. लोकांनी त्यांच्या लिखाणाचा स्वीकार केला, त्यामुळे त्यांना लाभ झाला. म्हणून श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे," मुनींमध्ये मी व्यास आहे."  याच कारणासाठी त्यांना भगवान व्यास असे संबोधले जाते.
मूढ माणसे तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवत नाहीत याची तू काळजी कशाला करतेस ? ते त्यांची मने संकुचित करून परमेश्वरावर मर्यादा आणत आहेत. तू केवळ सत्य लिहित आहेस. तुझ्या प्रेमाचा वेग कोणीही थांबवू शकणार नाही. गंगा अत्यंत वेगाने समुद्राकडे वाहत असते. परंतु अज्ञानी तिचा प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न  करतात. गंगेला समुद्राशी मिळवण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. गंगा दिशा बदलवून वाहत राहाते. त्यांनी कितीही मार्गांनी गंगेला रोखण्याचा प्रयत्न केला तरी ती समुद्राला भेटण्यासाठी नवनूतन मार्ग शोधून काढते. आता महासागर स्वतः गंगेला सामावून घेण्यासाठी पुढे येतो. याप्रमाणेच तुझ्या प्रेमाचा वेग कोणीही थांबवू शकत नाही. हे प्रेम सर्वांना दाखवून देण्यासाठी आपण येथे आलो आहोत. तू नक्की येशील. मी तुला बोलावेन.
वसंता - स्वामी, तुम्ही फक्त एकदाच मला बोलवा. मला तेवढे पुरेसे आहे. जर तुम्ही गप्प राहिलात तर त्यांना वाटेल की ते जे करत आहेत ते बरोबर आहे.
स्वामी - रडू नकोस. मी तुला बोलावेन. तुला कोणीही रोखू शकत नाही. तू सर्वशक्तिमान आहेस. तू सर्व काही करशील.
ध्यान समाप्ती

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

पुष्प बावीस 

            एक भक्त मला ' The Messenger ' ह्या  पुस्तकातील मजकूर वाचून दाखवत होते. ते ऐकून माझ्या मनात पुढील विचार आले.
            लेखक असे म्हणतो की जर एखाद्या व्यक्तिस एखादे कार्य करण्याची इच्छा असेल तर तिने अतिमानवी शक्तीशी संपर्क साधला पाहिजे. तो पुढे म्हणतो की जेव्हा एखादे कार्य पूर्णत्वास नेण्यात व्यक्तिगत शक्तीस अपयश आले तर समविचारी व समस्वभावी असणारी चार लोकं ते कार्य पूर्णत्वास नेण्यात यशस्वी होतात. जगामध्ये अतीमानवी शक्ती विद्यमान आहे. असे तो प्रतिपादन करतो आणि त्या शक्तीशी संपर्क साधून कोणतेही कार्य पूर्णत्वास जाऊ शकते.
           लेखकाने ह्याचे एक उदाहरण दिले आहे. एका लोकसमूहाने, आपण आपल्या विचारांनी टेबल हलवू शकतो असा दृढ संकल्प करून, त्यांची मने त्यावर केंद्रित केली. आपली शक्ती ह्या टेबलला हलवू शकते असे विचार पाठवले. त्यांचा त्यांच्या विचारांवर पूर्ण विश्वास होता. थोड्या वेळाने ते टेबल खरोखरच हलले. लेखकाने असे म्हटले आहे की जेव्हा विचार, दृढ संकल्पाने, विशिष्ठ उद्देशाने एकाग्र केले जातात तेव्हा अतिमानवी शक्ती स्वतःला प्रकट करते. वरील उदाहरणात त्या समूहाच्या शक्तीने टेबल हलले नसून ती त्यांच्या स्वतःच्या विचारांची परिणती होती. ह्यावरून हे सिद्ध होते की मनुष्यामध्ये जन्मजात असणारी शक्ती टेबलासारख्या अचल वस्तूलाही हलवू शकते.
            हे माझ्या जीवनाचे मर्म आहे. मी त्या सर्वव्यापी, सर्वशक्तिमान व सर्वज्ञ असलेल्या श्री सत्य साई बाबांचे नामरूप धारण केलेल्या पुर्णमशी स्वतःला जोडून घेतले आहे. मी माझ्या व्यक्तिगत शक्तीला वैश्विक शक्तीशी जोडल्यामुळे ती तिचे ज्ञान माझ्यापाशी प्रकट करते. मी सर्वत्र माझे स्वामी व्यापून राहिल्याचे पाहते. फलस्वरूप मला विश्वात्म्याचे दर्शन होते. ह्यामधून मला विश्वात्म ज्ञान ग्रहण करण्यासाठी वैश्विक शक्ती प्राप्त होते.
           माझा स्वामींप्रती असणारा एकाग्र भाव आणि निर्धार ह्याद्वारे मी जगामध्ये उलथापालथ घडवू शकते. जर विचार टेबल हलवू शकतात तर ते जगामध्ये परिवर्तन घडवू शकणार नाहीत ? मला परमेश्वराची  अनुभूती घ्यायची आहे. व परमेश्वरानेही माझी अनुभूती घ्यावी ह्या माझ्या दृढ संकल्पाची परिणीती म्हणजे सत्ययुगाची व प्रेम साई अवताराचे आगमन !
           तुम्हा प्रत्येकामध्ये ह्या शक्ती आहेत. परंतु तुम्ही  त्याचा वापर करत नाही. मी ह्या शक्तिंचा वापर सर्वांच्या कल्याणासाठी करते. ह्या परमेश्वराच्या सर्वज्ञ शक्तीचा वापर आपण आपल्या इच्छेनुसार लेखन आणि कृती करण्यासाठी करु शकतो. ही सर्वज्ञ शक्ती मी कशी खेचून घेऊ शकते ? मी सर्वांवर प्रेम करते. वैश्विक मुक्ती प्राप्त करण्यासाठी मी साधना केली. परमेश्वराने माझी विनंती मान्य केली व कृपावर्षाव केला. परिणामतः त्या आदिपुरुषाने स्वतःला माझ्यापुढे प्रकट केले. आपण सर्व त्या आदियाचेच अंश आहोत. एकदा का आपण आपल्या शक्ती त्याच्याशी जोडल्या की सर्व सत्य बनून जाते म्हणून स्वामी म्हणतात," सर्वांवर प्रेम करा."

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या 'Beyond The Vedas ' ह्या पुस्तकातून.

जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

जन्मदिन संदेश

           आपण परमेश्वराप्रती जेवढी श्रद्धा आणि भक्ती दर्शवू तेवढीच ती त्याच्याकडून आपल्याला परत मिळते. अशा प्रकारे परमेश्वराकडून तुम्हाला दिव्य ऊर्जा प्राप्त होते. परमेश्वराची भक्ती करा मग ती कोणत्याही स्वरूपात असो ! इष्टदेवतेच्या रूपात स्वामी आपल्या समोर आहेत. तुमचे मन त्यांच्यावर पुर्णपणे केंद्रित करा. तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलेत तर प्रतिबिंब, प्रतिक्रिया व प्रतिध्वनीच्या रूपात ते तुमच्याकडे परत येते. तुम्हाला दिव्य ऊर्जा प्राप्त होते.
             मी समस्त विश्वामध्ये परमेश्वराचे रूप पाहते. मी सर्व मानवजात, पशुपक्षी आणि अखिल विश्व ह्या सर्वांना प्रेम देते. मी प्रत्येक गोष्टीत दिव्यत्व पाहते. मला दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूचा भौतिक अर्थ बाजूला सारून ती वस्तू मी परमेश्वराशी जोडते. अशा तऱ्हेने ती वस्तू परमेश्वराशी जोडल्यानंतर, त्यातील दिव्य ऊर्जा माझ्याकडे प्रवाहित होते आणि मी पुर्णम् बनते.
             जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या एकाच नाम व रूपाची भक्ती करता तेव्हा तुम्हाला मिळणारा लाभ मर्यादित असतो. परंतु जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीस व प्रत्येकास परमेश्वराशी जोडता तेव्हा त्यातून प्राप्त होणारी दिव्य ऊर्जा अनंत असते, अमर्याद असते. तिच्यामध्ये विश्वाची उलथापालथ करण्याची क्षमता असते. कलियुगाची सत्ययुग बनवण्याचे सामर्थ्य असते. ही प्राणिक शक्ती तुमच्याकडे कशी येते ? जेव्हा तुम्ही सर्वांमधील चांगले पाहता तेव्हा त्यांच्यातील सर्व चांगले गुण तुमच्याकडे येतात. जेव्हा तुम्ही काही चांगले पाहिले आणि ते परमेश्वराशी जोडले तर तुम्हाला दिव्य ऊर्जा प्राप्त होते. परंतु जेव्हा तुम्ही केवळ वाईट पाहता इतरांमधील नकारात्मक गुण पाहता तेव्हा तुमच्या ऊर्जेचा अपव्यय होतो, ऱ्हास होतो.
            प्रत्येकजण नारायण आहे. बालपणापासून मी पुढील प्रार्थना करत होते." हे प्रभु, तू मला सर्व पुरुष, स्त्रिया व मुलांमध्ये नारायणाचे रूप पाहण्याची दृष्टी प्रदान कर." मी विनोबाजी कडून ही प्रार्थना शिकले. ही गोष्ट आचरणात कशी आणायची ?
             प्रत्येकजण नारायण आहे तथापि उच्चस्तरावर पोहोचेपर्यंत आपण विवेकाचा वापर केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचे अंधळेपणाने अनुसरण करू नका. 
             साधनेच्या मार्गावर वाटचाल करताना, प्रथम आपण विवेकाचा वापर केला पाहिजे. उच्च स्तरावर पोहोचल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराचे प्रकटीकरण असल्याचे आपल्या लक्षात येते. सर्वत्र केवळ परमेश्वर दिसतो.
             प्रत्येक गोष्ट परमेश्वर आहे. ज्याला ही सत्याची दृष्टी लाभते तो पूर्णत्वास प्राप्त होतो.

श्री वसंतसाई



जय साईराम

रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

"विश्व हा एक आरसा आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पाहता."

सूत्र सहावे 

पुर्णम् 

             जगात सत्य ज्ञात करून देण्यासाठी स्वामी आणि मी आलो आहोत. या सर्वश्रेष्ठ ज्ञानाने पुस्तकरूप धारण केले आहे आणि त्या सर्वश्रेष्ठ प्रेमाने नवनिर्मितीचे रूप धारण केले आहे. याचसाठी आम्ही भूतलावर आलो आहोत. 
             स्वामी त्यांचे प्रेम सदेह पूर्णत्वाने व्यक्त करतील. स्वामींचे पुर्णम म्हणजे काय ? जेव्हा स्वामींच्या प्रेमाचा माझ्या प्रेमाशी योग्य होईल तेव्हाच त्यांचे प्रेम पुर्णम् होईल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम   

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

        " आपण का जन्मलो ? मी कोण आहे ? यावर पुन्हा पुन्हा विचार करा."

सूत्र सहावे 

पुर्णम् 

              आतापर्यंत होऊन गेलेल्या युगांमध्ये धर्मसंस्थापना करण्यासाठी अवतारांनी जन्म घेतला. प्रेमभाव व्यक्त करण्याची तेव्हा गरज नव्हती. आता मात्र आम्ही प्रेमसंस्थापना करण्यासाठी आलो आहोत त्यामुळे स्वामींना त्यांचे प्रेम पूर्णपणे व्यक्त करावेच लागेल. माझी पुस्तके इतरांहून वेगळी असण्याचे हेच कारण आहे. ही  पुस्तके केवळ प्रेमविषयक आहेत. या प्रेमाने आगामी अवतारांची गुपिते, त्यांचे जीवन, वेदांच्या पलीकडे, उपनिषदांच्या पलीकडे, ब्रम्हसूत्र, शिवसूत्र, प्रेमसूत्र इ. अनेक सत्यं ज्ञात केली आहेत. 
            सर्वजण लेखन करू शकतात. अनेक महात्म्यांनी मिळवलेले ज्ञान आणि तपोबल या आधारे ब्रम्हसूत्र व शिवसूत्र लिहिले आहे. मी ते प्रत्यक्ष अनुभवातून लिहिले आहे. मला ब्रम्हाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यामुळे ब्रम्ह स्वतःच ते सर्व उघड करत आहे. ज्या व्यक्तीने ब्रम्हावस्था प्राप्त केली आहे केवळ तीच त्याविषयी सांगू शकते. तथापि एकदा ही ब्रम्हावस्था प्राप्त झाली की ती व्यक्ती लिहू शकत नाही ! जर ती लिहीत असेल तर तिने ब्रम्हावस्था प्राप्त केलेली नाही. माझ्या बाबतीत द्वैत शिल्लक आहे. एक अनुभवांमधून जाणून घेऊन लिहिते आहे तर दुसरे जे स्वतः ब्रम्ह आहे, ते सांगते आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

प्रत्येक गोष्टीत चांगले पाहा तोच परमेश्वर होय."

    सूत्र सहावे    
पुर्णम् 




११ जुलै २००८ ध्यान 
वसंता - स्वामी, तुमचे पुर्णम् म्हणजे काय ?
स्वामी - तू नेहमी मला म्हणतेस," मला तुमचे पुर्णम् हवे ", हा तुझा प्रेमभाव आहे. परमेश्वर केवळ साक्षी असतो. परमेश्वराकडून जे काही मिळते ते प्रत्येकाची भक्ती, प्रयत्न आणि श्रद्धा यांनुसार असते. एक उदाहरण देतो, अनेक जण तिरुपतीला तीर्थयात्रेला जातात. त्यांची श्रद्धा, भक्ती आणि प्रयत्न यानुसार त्यांच्या प्रार्थनांना फळ मिळते. ते तिथे पैसे किंवा वस्तू अर्पण करतात. 
इथे मी अनेकांना साखळ्या आणि अंगठ्या साक्षात करून देतो. मी स्वतः त्यांच्या बोटांत अंगठ्या घालतो किंवा गळ्यात साखळ्या घालतो. त्यांना दर्शन, स्पर्शन, संभाषण यांचा लाभ देतो. मी हे सर्व साक्षी अवस्थेतून करतो. सारे काही त्यांची भक्ती व पुण्य यानुसार दिले जाते. प्रत्येकाला जे काही मिळते ते त्याच्या पात्रतेनुसार मिळते. मंदिरांमध्ये केवळ मूर्ती असतात. परंतु इथे मी सदेह असल्यामुळे अधिक आनंद मिळतो. परमेश्वर साक्षी असून अविचल राहतो. 
पंढरपूरला जेव्हा तू पांडुरंगाला चरणस्पर्श केलास तेव्हा ' हा पांडुरंग माझा आहे, मी आता इथेच राहणार,' अशी भावना तुझ्या मनामध्ये उमटली. तुझा तुझ्या अश्रूंवरचा ताबा सुटला. अनेकांनी पांडुरंगाच्या मूर्तीला स्पर्श केला तथापि तुला एकटीलाच हा अनुभव कसा आला ? याचे कारण मी स्वतः रखुमाईच्या मूर्तीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. तू रखुमाई आहेस. पांडुरंगाला स्पर्श करताक्षणी तुला ती अनुभूती झाली. फक्त रखुमाईच्या याची अनुभूती घेऊ शकते. त्याचप्रमाणे हजारो भक्तांनी पादनमस्कार घेतला आहे. हजारोंना मी ' स्पर्शन ' दिले आहे. तरीही मी साक्षी अवस्थेत राहिलो आहे. मी अशा अवस्थेत आहे की, जिथे मला कोणीही स्पर्श करू शकत नाही, परंतु तू जेव्हा माझ्या चरणांना स्पर्श करशील तेव्हा तुझ्या मनात उमटलेले भाव माझ्यात उमटतील आणि तुलाही त्याची जाणीव होईल. असे भाव केवळ ईशशक्तीच्या मनात येऊ शकतात. 
पूर्वीच्या अवतारात हे असे नव्हते. त्यावेळी ते केवळ धर्मसंस्थापना करण्यासाठी आले होते. त्यांचे प्रेमभाव व्यक्त करण्याची त्यावेळी आवश्यकता नव्हती. या युगात मात्र परमेश्वराला त्याचे प्रेम व्यक्त करणे आवश्यक आहे. या पूर्ण प्रेमाची तू अनुभूती घेशील. हेच पुर्णम् आहे. 
वसंता - स्वामी आता मला समजले. आता मी लिहीन. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

     " कुटुंबाशी असणारे बंध पुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत होतात. परमेश्वराशी असणारे बंध मोक्ष प्रदान करतात."

सूत्र पाचवे 

कृतज्ञता

              स्वामी म्हणतात," सर्व काही तुझ्यामध्येच आहे, परंतु तुला वाटते की, तू सर्वांकडून धडे घेतलेस आणि तुला ते ऋण फेडायचे आहे. " मला ' मी ' नसल्यामुळे माझ्यामध्ये काय आहे हे मला माहित नाही. मला या जगाची भीती वाटते. जगातील कोणामध्येही सत्य, सचोटी व साधेपणा नाही. या जगात कसे जगावे हे मला माहित नाही. मला सर्वांचीच भीती वाटते. मी भीतभीतच सर्वांकडून धडे घेतले. यासाठी मी स्वतःस  सर्वांना द्यायला हवे. सत्यसाईंनी सुगंधित रिक्त ' वसंत ' घट सर्वांमध्ये शिरकाव करतो आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " परमेश्वराला तुमच्यामध्ये प्रस्थापित करा. तुम्ही परमेश्वरामध्ये प्रस्थापित व्हा."

सूत्र पाचवे

कृतज्ञता

             पुण्यामध्ये मी मुक्ती सीकर्स सेंटरसाठी एक कविता व दिनेशसाठी एक कविता करून दिली. मुंबईमध्ये मी चौघांना कविता दिल्या. जे माझ्या आणि स्वामींच्या मध्ये दूत बनून काम करतात, माझी पत्रे, पुस्तके व इतर काही गोष्टी स्वामींना देतात, त्यांच्यासाठी सुद्धा मी कविता केल्या. कवितेतील भाव किती काळ त्यांच्या लक्षात राहणार ? किती जण त्या आपल्या संग्रही ठेवतील ? थोडे दिवस त्यांना आनंद वाटेल, मग विसरून जतील. शाश्वत काय आहे ? मी स्वतःलाच सर्वांना देणे. 
              या जगात मी सर्वांकडून काही ना काही शिकले. माझे हे अनुभव मी अनेक पुस्तकांमधून लिहिले आहेत. मी अळीपासून ते ब्रम्हापर्यंत सर्वांकडून धडे घेतले आहेत, म्हणून मला परतफेड करायची आहे. यासाठीच मी वैश्विक मुक्तीचा वर मागून घेतला आहे. ही माझी गुरुदक्षिणा आहे, माझी कृतज्ञता आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

         " प्रेम हे नाम, रूप, स्थळ आणि काळ या सर्वांच्या पलीकडे आहे."

सूत्र पाचवे

कृतज्ञता

             प्रथम मी सर्वांना अनेक गोष्टी दिल्या. त्यानंतर मी कवितांमधून भाव व्यक्त केले. स्वामींनी त्या कवितांमध्ये एखादी ओळ लिहावी अशी मी त्यांना विनंती केली. त्यानेही माझे समाधान झाले नाही. प्रत्येकाला मी स्वतःस पूर्णत्वाने देऊ करावे अशी माझी इच्छा आहे. 
             वस्तू नश्वर असतात. स्वामींनी आणि मी कवितांमधून व्यक्त केलेल्या भावाविष्कारातून मिळणारा आनंदही तात्पुरता आहे, क्षणिक आहे. मी अनेकांना माझा कृतज्ञ भाव दर्शविण्यासाठी कविता लिहून दिल्या आहेत. कोईम्बतूरमधील चार भक्त नेहमी  मला सत्संग देण्यासाठी बोलावतात. त्यांची ज्ञानलालसा पाहून माझे कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी मी एक काव्य करून त्यांना दिले. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम