रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

प्रत्येक गोष्टीत चांगले पाहा तोच परमेश्वर होय."

    सूत्र सहावे    
पुर्णम् 




११ जुलै २००८ ध्यान 
वसंता - स्वामी, तुमचे पुर्णम् म्हणजे काय ?
स्वामी - तू नेहमी मला म्हणतेस," मला तुमचे पुर्णम् हवे ", हा तुझा प्रेमभाव आहे. परमेश्वर केवळ साक्षी असतो. परमेश्वराकडून जे काही मिळते ते प्रत्येकाची भक्ती, प्रयत्न आणि श्रद्धा यांनुसार असते. एक उदाहरण देतो, अनेक जण तिरुपतीला तीर्थयात्रेला जातात. त्यांची श्रद्धा, भक्ती आणि प्रयत्न यानुसार त्यांच्या प्रार्थनांना फळ मिळते. ते तिथे पैसे किंवा वस्तू अर्पण करतात. 
इथे मी अनेकांना साखळ्या आणि अंगठ्या साक्षात करून देतो. मी स्वतः त्यांच्या बोटांत अंगठ्या घालतो किंवा गळ्यात साखळ्या घालतो. त्यांना दर्शन, स्पर्शन, संभाषण यांचा लाभ देतो. मी हे सर्व साक्षी अवस्थेतून करतो. सारे काही त्यांची भक्ती व पुण्य यानुसार दिले जाते. प्रत्येकाला जे काही मिळते ते त्याच्या पात्रतेनुसार मिळते. मंदिरांमध्ये केवळ मूर्ती असतात. परंतु इथे मी सदेह असल्यामुळे अधिक आनंद मिळतो. परमेश्वर साक्षी असून अविचल राहतो. 
पंढरपूरला जेव्हा तू पांडुरंगाला चरणस्पर्श केलास तेव्हा ' हा पांडुरंग माझा आहे, मी आता इथेच राहणार,' अशी भावना तुझ्या मनामध्ये उमटली. तुझा तुझ्या अश्रूंवरचा ताबा सुटला. अनेकांनी पांडुरंगाच्या मूर्तीला स्पर्श केला तथापि तुला एकटीलाच हा अनुभव कसा आला ? याचे कारण मी स्वतः रखुमाईच्या मूर्तीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. तू रखुमाई आहेस. पांडुरंगाला स्पर्श करताक्षणी तुला ती अनुभूती झाली. फक्त रखुमाईच्या याची अनुभूती घेऊ शकते. त्याचप्रमाणे हजारो भक्तांनी पादनमस्कार घेतला आहे. हजारोंना मी ' स्पर्शन ' दिले आहे. तरीही मी साक्षी अवस्थेत राहिलो आहे. मी अशा अवस्थेत आहे की, जिथे मला कोणीही स्पर्श करू शकत नाही, परंतु तू जेव्हा माझ्या चरणांना स्पर्श करशील तेव्हा तुझ्या मनात उमटलेले भाव माझ्यात उमटतील आणि तुलाही त्याची जाणीव होईल. असे भाव केवळ ईशशक्तीच्या मनात येऊ शकतात. 
पूर्वीच्या अवतारात हे असे नव्हते. त्यावेळी ते केवळ धर्मसंस्थापना करण्यासाठी आले होते. त्यांचे प्रेमभाव व्यक्त करण्याची त्यावेळी आवश्यकता नव्हती. या युगात मात्र परमेश्वराला त्याचे प्रेम व्यक्त करणे आवश्यक आहे. या पूर्ण प्रेमाची तू अनुभूती घेशील. हेच पुर्णम् आहे. 
वसंता - स्वामी आता मला समजले. आता मी लिहीन. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा