ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण का जन्मलो ? मी कोण आहे ? यावर पुन्हा पुन्हा विचार करा."
सूत्र सहावे
पुर्णम्
आतापर्यंत होऊन गेलेल्या युगांमध्ये धर्मसंस्थापना करण्यासाठी अवतारांनी जन्म घेतला. प्रेमभाव व्यक्त करण्याची तेव्हा गरज नव्हती. आता मात्र आम्ही प्रेमसंस्थापना करण्यासाठी आलो आहोत त्यामुळे स्वामींना त्यांचे प्रेम पूर्णपणे व्यक्त करावेच लागेल. माझी पुस्तके इतरांहून वेगळी असण्याचे हेच कारण आहे. ही पुस्तके केवळ प्रेमविषयक आहेत. या प्रेमाने आगामी अवतारांची गुपिते, त्यांचे जीवन, वेदांच्या पलीकडे, उपनिषदांच्या पलीकडे, ब्रम्हसूत्र, शिवसूत्र, प्रेमसूत्र इ. अनेक सत्यं ज्ञात केली आहेत.
सर्वजण लेखन करू शकतात. अनेक महात्म्यांनी मिळवलेले ज्ञान आणि तपोबल या आधारे ब्रम्हसूत्र व शिवसूत्र लिहिले आहे. मी ते प्रत्यक्ष अनुभवातून लिहिले आहे. मला ब्रम्हाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यामुळे ब्रम्ह स्वतःच ते सर्व उघड करत आहे. ज्या व्यक्तीने ब्रम्हावस्था प्राप्त केली आहे केवळ तीच त्याविषयी सांगू शकते. तथापि एकदा ही ब्रम्हावस्था प्राप्त झाली की ती व्यक्ती लिहू शकत नाही ! जर ती लिहीत असेल तर तिने ब्रम्हावस्था प्राप्त केलेली नाही. माझ्या बाबतीत द्वैत शिल्लक आहे. एक अनुभवांमधून जाणून घेऊन लिहिते आहे तर दुसरे जे स्वतः ब्रम्ह आहे, ते सांगते आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा