बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

जन्मदिन संदेश

           आपण परमेश्वराप्रती जेवढी श्रद्धा आणि भक्ती दर्शवू तेवढीच ती त्याच्याकडून आपल्याला परत मिळते. अशा प्रकारे परमेश्वराकडून तुम्हाला दिव्य ऊर्जा प्राप्त होते. परमेश्वराची भक्ती करा मग ती कोणत्याही स्वरूपात असो ! इष्टदेवतेच्या रूपात स्वामी आपल्या समोर आहेत. तुमचे मन त्यांच्यावर पुर्णपणे केंद्रित करा. तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलेत तर प्रतिबिंब, प्रतिक्रिया व प्रतिध्वनीच्या रूपात ते तुमच्याकडे परत येते. तुम्हाला दिव्य ऊर्जा प्राप्त होते.
             मी समस्त विश्वामध्ये परमेश्वराचे रूप पाहते. मी सर्व मानवजात, पशुपक्षी आणि अखिल विश्व ह्या सर्वांना प्रेम देते. मी प्रत्येक गोष्टीत दिव्यत्व पाहते. मला दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूचा भौतिक अर्थ बाजूला सारून ती वस्तू मी परमेश्वराशी जोडते. अशा तऱ्हेने ती वस्तू परमेश्वराशी जोडल्यानंतर, त्यातील दिव्य ऊर्जा माझ्याकडे प्रवाहित होते आणि मी पुर्णम् बनते.
             जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या एकाच नाम व रूपाची भक्ती करता तेव्हा तुम्हाला मिळणारा लाभ मर्यादित असतो. परंतु जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीस व प्रत्येकास परमेश्वराशी जोडता तेव्हा त्यातून प्राप्त होणारी दिव्य ऊर्जा अनंत असते, अमर्याद असते. तिच्यामध्ये विश्वाची उलथापालथ करण्याची क्षमता असते. कलियुगाची सत्ययुग बनवण्याचे सामर्थ्य असते. ही प्राणिक शक्ती तुमच्याकडे कशी येते ? जेव्हा तुम्ही सर्वांमधील चांगले पाहता तेव्हा त्यांच्यातील सर्व चांगले गुण तुमच्याकडे येतात. जेव्हा तुम्ही काही चांगले पाहिले आणि ते परमेश्वराशी जोडले तर तुम्हाला दिव्य ऊर्जा प्राप्त होते. परंतु जेव्हा तुम्ही केवळ वाईट पाहता इतरांमधील नकारात्मक गुण पाहता तेव्हा तुमच्या ऊर्जेचा अपव्यय होतो, ऱ्हास होतो.
            प्रत्येकजण नारायण आहे. बालपणापासून मी पुढील प्रार्थना करत होते." हे प्रभु, तू मला सर्व पुरुष, स्त्रिया व मुलांमध्ये नारायणाचे रूप पाहण्याची दृष्टी प्रदान कर." मी विनोबाजी कडून ही प्रार्थना शिकले. ही गोष्ट आचरणात कशी आणायची ?
             प्रत्येकजण नारायण आहे तथापि उच्चस्तरावर पोहोचेपर्यंत आपण विवेकाचा वापर केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचे अंधळेपणाने अनुसरण करू नका. 
             साधनेच्या मार्गावर वाटचाल करताना, प्रथम आपण विवेकाचा वापर केला पाहिजे. उच्च स्तरावर पोहोचल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराचे प्रकटीकरण असल्याचे आपल्या लक्षात येते. सर्वत्र केवळ परमेश्वर दिसतो.
             प्रत्येक गोष्ट परमेश्वर आहे. ज्याला ही सत्याची दृष्टी लाभते तो पूर्णत्वास प्राप्त होतो.

श्री वसंतसाई



जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा