ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराला तुमच्यामध्ये प्रस्थापित करा. तुम्ही परमेश्वरामध्ये प्रस्थापित व्हा."
सूत्र पाचवे
कृतज्ञता
पुण्यामध्ये मी मुक्ती सीकर्स सेंटरसाठी एक कविता व दिनेशसाठी एक कविता करून दिली. मुंबईमध्ये मी चौघांना कविता दिल्या. जे माझ्या आणि स्वामींच्या मध्ये दूत बनून काम करतात, माझी पत्रे, पुस्तके व इतर काही गोष्टी स्वामींना देतात, त्यांच्यासाठी सुद्धा मी कविता केल्या. कवितेतील भाव किती काळ त्यांच्या लक्षात राहणार ? किती जण त्या आपल्या संग्रही ठेवतील ? थोडे दिवस त्यांना आनंद वाटेल, मग विसरून जतील. शाश्वत काय आहे ? मी स्वतःलाच सर्वांना देणे.
या जगात मी सर्वांकडून काही ना काही शिकले. माझे हे अनुभव मी अनेक पुस्तकांमधून लिहिले आहेत. मी अळीपासून ते ब्रम्हापर्यंत सर्वांकडून धडे घेतले आहेत, म्हणून मला परतफेड करायची आहे. यासाठीच मी वैश्विक मुक्तीचा वर मागून घेतला आहे. ही माझी गुरुदक्षिणा आहे, माझी कृतज्ञता आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा