ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराची शिकवण आचरणात आणली नाही तर त्याच्या दर्शनाचा काय उपयोग ?"
सूत्र सातवे
वेग
वसंता - स्वामी, माझे प्रिय प्रभू,
स्वामी - मी सुद्धा तुझे प्रेम, तुझे अश्रू, तुझी तळमळ आणि तुझी निकटता अनुभवण्यासाठी व्याकुळ झालो आहे. मी इथे कशासाठी आलो आहे ? केवळ तुझे प्रेम अनुभवण्यासाठी. मला तुझे प्रेम अनुभवायचे आहे आणि जगासमोर आपले प्रेम प्रकट करायचे आहे. मी तुझ्या सान्निध्यासाठी आणि स्पर्शासाठी तळमळतो आहे.
अनेक महात्म्यांना ध्यानामधून उच्च ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी ते जगाला ज्ञात करून दिले. परमेश्वर स्वतः येऊन कधीही सांगत नाही, " तू जे लिहित आहेस ते बरोबर आहे."
व्यासांनी संकलन करून १८ पुराणे व ४ वेद यांमध्ये धर्मग्रंथ विभागित केले. त्यानंतर त्यांनी ब्रम्हसूत्र लिहिले. लोकांनी त्यांच्या लिखाणाचा स्वीकार केला, त्यामुळे त्यांना लाभ झाला. म्हणून श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे," मुनींमध्ये मी व्यास आहे." याच कारणासाठी त्यांना भगवान व्यास असे संबोधले जाते.
मूढ माणसे तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवत नाहीत याची तू काळजी कशाला करतेस ? ते त्यांची मने संकुचित करून परमेश्वरावर मर्यादा आणत आहेत. तू केवळ सत्य लिहित आहेस. तुझ्या प्रेमाचा वेग कोणीही थांबवू शकणार नाही. गंगा अत्यंत वेगाने समुद्राकडे वाहत असते. परंतु अज्ञानी तिचा प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न करतात. गंगेला समुद्राशी मिळवण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. गंगा दिशा बदलवून वाहत राहाते. त्यांनी कितीही मार्गांनी गंगेला रोखण्याचा प्रयत्न केला तरी ती समुद्राला भेटण्यासाठी नवनूतन मार्ग शोधून काढते. आता महासागर स्वतः गंगेला सामावून घेण्यासाठी पुढे येतो. याप्रमाणेच तुझ्या प्रेमाचा वेग कोणीही थांबवू शकत नाही. हे प्रेम सर्वांना दाखवून देण्यासाठी आपण येथे आलो आहोत. तू नक्की येशील. मी तुला बोलावेन.
वसंता - स्वामी, तुम्ही फक्त एकदाच मला बोलवा. मला तेवढे पुरेसे आहे. जर तुम्ही गप्प राहिलात तर त्यांना वाटेल की ते जे करत आहेत ते बरोबर आहे.
स्वामी - रडू नकोस. मी तुला बोलावेन. तुला कोणीही रोखू शकत नाही. तू सर्वशक्तिमान आहेस. तू सर्व काही करशील.
ध्यान समाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा