ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प बावीस
एक भक्त मला ' The Messenger ' ह्या पुस्तकातील मजकूर वाचून दाखवत होते. ते ऐकून माझ्या मनात पुढील विचार आले.
लेखक असे म्हणतो की जर एखाद्या व्यक्तिस एखादे कार्य करण्याची इच्छा असेल तर तिने अतिमानवी शक्तीशी संपर्क साधला पाहिजे. तो पुढे म्हणतो की जेव्हा एखादे कार्य पूर्णत्वास नेण्यात व्यक्तिगत शक्तीस अपयश आले तर समविचारी व समस्वभावी असणारी चार लोकं ते कार्य पूर्णत्वास नेण्यात यशस्वी होतात. जगामध्ये अतीमानवी शक्ती विद्यमान आहे. असे तो प्रतिपादन करतो आणि त्या शक्तीशी संपर्क साधून कोणतेही कार्य पूर्णत्वास जाऊ शकते.
लेखकाने ह्याचे एक उदाहरण दिले आहे. एका लोकसमूहाने, आपण आपल्या विचारांनी टेबल हलवू शकतो असा दृढ संकल्प करून, त्यांची मने त्यावर केंद्रित केली. आपली शक्ती ह्या टेबलला हलवू शकते असे विचार पाठवले. त्यांचा त्यांच्या विचारांवर पूर्ण विश्वास होता. थोड्या वेळाने ते टेबल खरोखरच हलले. लेखकाने असे म्हटले आहे की जेव्हा विचार, दृढ संकल्पाने, विशिष्ठ उद्देशाने एकाग्र केले जातात तेव्हा अतिमानवी शक्ती स्वतःला प्रकट करते. वरील उदाहरणात त्या समूहाच्या शक्तीने टेबल हलले नसून ती त्यांच्या स्वतःच्या विचारांची परिणती होती. ह्यावरून हे सिद्ध होते की मनुष्यामध्ये जन्मजात असणारी शक्ती टेबलासारख्या अचल वस्तूलाही हलवू शकते.
हे माझ्या जीवनाचे मर्म आहे. मी त्या सर्वव्यापी, सर्वशक्तिमान व सर्वज्ञ असलेल्या श्री सत्य साई बाबांचे नामरूप धारण केलेल्या पुर्णमशी स्वतःला जोडून घेतले आहे. मी माझ्या व्यक्तिगत शक्तीला वैश्विक शक्तीशी जोडल्यामुळे ती तिचे ज्ञान माझ्यापाशी प्रकट करते. मी सर्वत्र माझे स्वामी व्यापून राहिल्याचे पाहते. फलस्वरूप मला विश्वात्म्याचे दर्शन होते. ह्यामधून मला विश्वात्म ज्ञान ग्रहण करण्यासाठी वैश्विक शक्ती प्राप्त होते.
माझा स्वामींप्रती असणारा एकाग्र भाव आणि निर्धार ह्याद्वारे मी जगामध्ये उलथापालथ घडवू शकते. जर विचार टेबल हलवू शकतात तर ते जगामध्ये परिवर्तन घडवू शकणार नाहीत ? मला परमेश्वराची अनुभूती घ्यायची आहे. व परमेश्वरानेही माझी अनुभूती घ्यावी ह्या माझ्या दृढ संकल्पाची परिणीती म्हणजे सत्ययुगाची व प्रेम साई अवताराचे आगमन !
तुम्हा प्रत्येकामध्ये ह्या शक्ती आहेत. परंतु तुम्ही त्याचा वापर करत नाही. मी ह्या शक्तिंचा वापर सर्वांच्या कल्याणासाठी करते. ह्या परमेश्वराच्या सर्वज्ञ शक्तीचा वापर आपण आपल्या इच्छेनुसार लेखन आणि कृती करण्यासाठी करु शकतो. ही सर्वज्ञ शक्ती मी कशी खेचून घेऊ शकते ? मी सर्वांवर प्रेम करते. वैश्विक मुक्ती प्राप्त करण्यासाठी मी साधना केली. परमेश्वराने माझी विनंती मान्य केली व कृपावर्षाव केला. परिणामतः त्या आदिपुरुषाने स्वतःला माझ्यापुढे प्रकट केले. आपण सर्व त्या आदियाचेच अंश आहोत. एकदा का आपण आपल्या शक्ती त्याच्याशी जोडल्या की सर्व सत्य बनून जाते म्हणून स्वामी म्हणतात," सर्वांवर प्रेम करा."
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या 'Beyond The Vedas ' ह्या पुस्तकातून.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा