गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

           " प्रथम साधना करून आपण मोक्ष प्राप्त केला पाहिजे आणि नंतर स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले पाहिजे."

सूत्र आठवे

भगवंत परतफेड करतो 

              आता आपण माझ्या जीवनावर नजर टाकूया. जन्मापासून मी केवळ परमेश्वरासाठीच जगते आहे, मला त्याच्या सहवासात जीवन जगण्याची इच्छा आहे. मला त्याच्याशी विवाह करायचा आहे. मी त्याच्या जवळिकीसाठी तळमळते आहे. माझे संपूर्ण जीवन अश्रूमय आहे. माझ्या मनात आता जे भाव आहेत, त्यांची प्रतिक्रिया, प्रतिबिंब व प्रतिध्वनी म्हणून स्वामी पुन्हा अवतार घेणार आहेत. माझी तळमळ, माझे अश्रू आणि माझी त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा याचा ते अनुभव घेतील. प्रेमसाई अवतार केवळ एवढ्यासाठीच आहे. भविष्यात काय घडेल हे कोणालाच माहित नसते. तथापि प्रेमसाई अवतारात काय घडेल ते मला माहीत आहे. आता स्वामींबरोबर ध्यानामध्ये मी जे जे काही अनुभवते आहे ते पुढील अवतारात मी सदेह अनुभवणार आहे.आता जे ध्यानात आहे ते पुढे भौतिकदृष्ट्या घडेल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " जीव परमेश्वराचा शोध घेत, त्याचा पुकारा करत त्याच्याकडे धाव घेतो. परमेश्वर त्याच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो व त्याच्याकडे धावत जाऊन त्याला आपल्या कृपाछत्राखाली घेतो. "

सूत्र आठवे 

भगवंत परतफेड करतो 

            या जगामध्ये मनुष्य ज्या काही क्रिया व कृती करतो, त्याचे अनुभव प्रतिक्रिया, प्रतिध्वनी व प्रतिबिंब याद्वारे त्याच्याकडे परततात. हे केवळ क्रियांमधूनच घडत नाही तर व्यक्तीचे गुणविशेष, सवयी व विचारधारा यांनुसारही  प्रतिबिंब अनुभवले जाते. 
             मनुष्य आपल्या पूर्वकर्मांची फळे अनुभवण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. मनुष्य आता जे कर्म करतो त्याचे फळ तो पुढील जन्मात अनुभवतो, ते अनुभवण्यासाठीच तो पृथ्वीतलावर जन्म घेतो. हा कर्मकायदा आहे. या कायद्यानुसार त्याला स्वतःच्या कर्मांचे फळ भोगावेच लागते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  
  

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

जन्मदिन संदेश

भगवान बाबांशी संदेश कसा साधायचा?

            इतक्या काळज्या, इतक्या समस्या, माझी तब्येत बरी नाही, मी श्रीमंत नाही, माझी इतरांकडून उपेक्षा केली जाते, माझे लग्न झाले नाही, मला मुलेबाळे नाहीत ..... भगवान माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत. का ? का ? माझ्या प्रार्थना ऐकू जातील इतक्या अंतरावर ते आहेत का ? का त्यांना माझ्या समस्या सोडवण्यात काही स्वारस्य नाही ?
             तुम्हाला असं वाटतं का की भगवान कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही स्वामींपासून दूर आहात ? नाही, नाही ..... मी दुसरीकडे कोठे नाही मी तुमच्या पासून दूर नाही. मी तुमच्या प्रार्थनांना प्रतिसाद देण्याचे टाळले नाही.
             एक गोष्ट ऎका हे जग हे कलियुग नकारात्मकतेने भरलेले आहे. मनुष्य त्याला परमेश्वराकडून काहीतरी हवे किंवा त्याच्या समस्यांचे निराकरण करण्याची प्रार्थना करण्यासाठी मंदिरांमध्ये धावत असतो. तुम्हाला असं वाटत का की भगवान म्हणजे तुम्हाला सतत हव्या असणाऱ्या गोष्टींचा विक्रेता आहे ? मी तुम्हाला कोणतीही गोष्ट विकण्यासाठी येथे  आलो नाही. तुम्ही माझ्याकडे कोणतीही गोष्ट मागण्याची गरज नाही. वासरांसाठी नेहमीच गाय दूध तयार ठेवते. वासरे दूध पिण्यासाठी कधीही तिची परवानगी घेत नाहीत वा तिला विंनती करत नाहीत. तुमची श्रद्धा आणि मी तुमच्यामध्ये असल्याची तुम्हाला समज असूनही तुम्ही प्रार्थना का करता ? स्वामी, मला हे हवे, असे माझ्याकडे मागण्याची गरज नाही.
            तुम्ही तुमच्या अंतरात माझ्याशी संवाद साधा प्रत्येक बाबतीत माझ्याशी चर्चा करा. जर तुम्हाला माझ्याकडून उत्तर मिळाले नाही तर माझ्याशी भांडा. तुम्हाला सर्व हक्क स्वाधीन आहेत कारण तुम्ही माझी प्रिय लेकरे आहात. आज मी तुम्हाला एक गुपित सांगतो. पहाटेच्या वेळी तुमच्या बिछान्यातून उठा आणि अंतरात मला सुप्रभात म्हणा आणि मग तुमचा दिवस सुरु करा. रात्री मला शुभरात्री म्हणून झोपा. ह्याचा सराव केल्याने तुम्हाला स्वामींच्या खूप जवळ असल्यासारखे वाटेल. सर्व दिवस शुभ आहेत. प्रत्येक क्षण स्वामींनी आशीर्वादित केलेला आहे. मग तुम्ही म्हणाल की मी स्वामींना सुप्रभात, शुभरात्री का म्हणू? तुम्ही हे म्हणणे महत्वाचे नाही. आई जसे मुलाला ' अम्मा ' म्हणायला शिकवते, तसे तुम्ही मला प्रथम सुप्रभात व शुभरात्री म्हणा. हळूहळू तुम्ही माझ्याशी संवाद सुरु करा आणि मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याची मी तुम्हाला ग्वाही देतो.
             तुम्ही तुमची कंपने (Frequencies ) प्रथम माझ्याशी जुळवा, माझ्याशी सुसंवाद साधा मी तुम्हाला संकेत पाठवीन आणि तुम्ही माझा आवाज स्पष्ट ऐकू शकाल. समुद्र पाण्याने भरलेला असतो परंतु प्रचंड आकाराचे जहाज त्यावर तरंगते. त्या जहाजाच्या आता जर पाणी शिरले तर मात्र ते बुडते. नाकारात्मकताही अशीच आहे. माझ्यावर श्रद्ध ठेवा आणि तुमची जीवनयात्रा सुरु करा. जर तुमच्या मनात तिळमात्र शंका असेल तर तुमची जीवननौका बुडेल. भगवानांच्या सदैव अनुसंधानात राहा.
             मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला माझे आशीर्वाद लाभले नाहीत असा कधीही विचार करू नका. मी अगोदरच तुम्हाला आशीर्वाद दिले आहेत म्हणून तर तुम्ही माझे भक्त आहात. तुमच्या आनंदासाठी मी सदैव तुम्हाला आशीर्वाद देतो.

- भगवान श्री सत्य साई बाबा



जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प तेवीस 
वेद - दृश्य आणि अदृश्य

             एक दिवस आम्हाला दर्शनासाठी प्रथम क्रमांकाचे टोकन मिळाले पहिल्या ओळीत बसण्याचे टाळून मी दुसऱ्या ओळीत बसले. मला पहिल्या ओळीत बसून लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे नव्हते. माझा लहानपानापासूनच असा स्वभाव होता. मी स्वतःला इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न करते. हा ' मी ' आणि हा 'देह ' इतरांच्या दृष्ट्टीस पडू नये अशी माझी इच्छा असते.
              हा देह इतरांपासून लपवून ठेवण्याची गोष्ट आहे. पूर्व जन्मातील चुका व इच्छांची निष्पत्ती म्हणजे जन्म होय. आपण हे जाणले पाहिजे की भौतिक सुखाचा आनंद लुटण्यासाठी हा देह दिला नसून परमेश्वर प्राप्त करून घेण्यासाठी साधना करण्याच्या हेतूने दिलेला आहे. देह धारण करणे ही एक लज्जास्पद गोष्ट आहे. जर आपण शुद्ध असतो तर परमेश्वराशी आपला योग झाला असता आणि आपण जन्म घेतला नसता. जन्म हा आपल्या अशुद्धतेचे द्योतक आहे.
            आता आपण स्वामींचे उदाहरण पाहू. दर्शनाच्या वेळी जेव्हा स्वामी येतात तेव्हा त्यांच्या कफणीने त्यांचे संपूर्ण शरीर झाकलेले असते. आपणास केवळ त्यांचा चेहरा दोन तळहात व पावले दिसतात.
             ह्या युगाचा अवतार आपणास अशी शिकवण देतो की देह ही अशी गोष्ट आहे की ती लपवून ठेवावी. आपला जन्म ही आपल्यासाठी शरमेची बाबा आहे. आपल्या मुर्खपणामुळे आपण जन्म घेतो.
            जरी तुम्ही ह्या देहाला जडजवाहिरांनी सजवण्याचा प्रयत्न केलात तरी तो एक कचऱ्याचा डबा आहे. मानवी देह मूत्र, विष्ठा, लाळ, कफ आणि घाम ह्यासारख्या गोष्टींनी भरलेला आहे. मानवी मन हजारो जन्मांमध्ये संग्रहित केलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, आसक्ती ह्या सारख्या दुर्गुणांनी लिप्त आहे.
           रुग्णास जेव्हा नैसर्गिक रितीने लघवी होत नाही तेव्हा तो कॅथेटर आणि पिशवीचा वापर करतो. त्याची पिशवी पाहून आपण अस्वस्थ होतो. तथापि ती बाहेर दिसणारी असून मूत्राशयासारखीच आहे. जी आपल्या दृष्टीआड असते. ते बाहेर दिसू लागताच किळसवाणे वाटते. ते आपल्या आतही नसते का ? अशा ह्या देह आणि मनाचे प्रदर्शन करण्यास आपल्याला शरम वाट्याला नको का ?
            पुट्टपर्तीमधील समाधी रस्त्यावर असलेले कचऱ्याचे ढीग उचलण्यासाठी ट्रक येतो. तेथे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असल्याने लोकं नाकाला रुमाल लावून वेगाने पुढे चालत जातात. जरी कचरापेटीला बाहेरून हारतुऱ्यांनी सजवले, रेशमी कापडचे आच्छादन घातले सुगंधी अत्तराचे फवारे मारले तरी ती कचरापेटीच राहणार.
             आपले शरीरही एक चालती फिरती कचरापेटीच आहे. आपण तिचे बाह्य रूप सजवून इकडे तिकडे फिरतो. ब्युटी पार्लरला भेट देऊन सौंदर्यवर्धन करतो. एखादी साडी घेण्यासाठी अनेक दुकानांमध्ये जातो. सराफाकडे जाऊन दागदागिने विकत घेतो. किती प्रकारांनी आपण स्वतःला सजवतो !
             वास्तविक, ही देहरूपी कचरा पेटी ह्या भूतलावर कधीही दिसू नये आणि जर देह भूतलावर आला तर तो योग्य कपड्यांनी पूर्ण आच्छादित करावा. ह्या देहाने भूतलावर पुन्हा जन्म घेऊ नये म्हणून आपण साधना केली पाहिजे. आतमधील मलिनता काढून टाकण्यासाठी साधना केली पाहिजे. जर अशा तऱ्हेने आपण साधना केली तर आपल्या देहामध्ये परमेश्वरास क्रियाशील बनवणे आपल्याला शक्य होईल. मानवी तत्व बदलून ईश्वरी तत्व कार्यरत होऊ शकेल. ह्या वसंता नामक मानवी देहात दिव्य तत्व  कसे कार्य करते हे स्तूप दर्शवतो.
           जर परमेश्वराला क्रियाशील बनवायचे असेल तर देह शुद्ध आणि पवित्र बनवणे आवश्यक आहे. ह्या अवस्थेमध्ये जर स्वामींच्या दर्शन, स्पर्शन, संभाषणाची अनुभूती घेतली तर आपण पूर्णत्वास पोहोचतो.

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' साई डायजेस्ट ' ह्या पुस्तकातून.

जय साईराम    

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" आपण इथेच, याक्षणी मुक्ती  प्राप्त करू शक्तो."

सूत्र सातवे 

वेग

            जर ही एक वसंता परमेश्वर आहे तर समग्र वसंतमयम् प्रपंचही परमेश्वर आहे, ईश्वर आहे, प्रभू आहे. 
            इथे कोणीलाही इतरांसाठी स्वतःचे सत्य प्रस्थापित करण्याची गरज नाही. मी ईश्वर आहे, तुम्ही ईश्वर आहात, आपले प्रज्ञान ईश्वर आहे. सर्वजण समान आहेत. यालाच म्हणतात, ' अहं ब्रम्हास्मि ', 'तत् त्वम असि ', 'अयं आत्मब्रम्ह, प्रज्ञानं ब्रम्ह ' सर्वांना ही स्थिती प्राप्त होईल तेव्हाच माझ्या प्रेमाचा वेग स्वामींमध्ये विलीन होईल. 
             माझ्या नाडीमध्ये असे म्हटले आहे की,            परमेश्वरप्राप्तीसाठी एकमेव तत्व म्हणून मी प्रेममार्गाचा पुरस्कार करेन. प्रेममार्गाने परमेश्वर प्राप्ती होईल. हे प्रेमसूत्र आहे. ही वसंताची जन्मकुंडली सर्वांची जन्मकुंडली असेल. वसंताची नाडी सर्वांची नाडी असेल, माझी लग्नरास, जन्मरास, नक्षत्र जे असेल तेच सर्वांचे असेल, मी जशी आहे तसे वसंतमय विश्व असेल. एक वसंता जर परमेश्वर आहे तर सर्वजण परमेश्वर आहेत. स्वामी नेहमी म्हणतात," मी परमेश्वर आहे. तुम्हीही परमेश्वर आहात. सर्वजण परमेश्वर आहेत." तरी कोणालाही याचे आकलन होत नाही. आता माझ्या जीवनातून मी हे सर्वांना दाखवत आहे. मी परमेश्वर आहे, तुम्ही परमेश्वर आहात. वसंतमयम्द्वारे मी हे सिद्ध करत आहे की, मी परमेश्वर आहे, तुम्ही परमेश्वर आहात. हे सत्ययुग आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम     

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" आपले भाव रूप धारण करून आपले जीवन बनवतात."

सूत्र सातवे

वेग 

            ज्ञानोदय झाल्यानंतर व्यक्ती लिखाणाद्वारे त्या ज्ञानात इतरांना सहभागी करून घेते. माझ्या पुस्तकांमधील ज्ञान वसंता नावाच्या व्यक्तीमध्ये उदयाला आले नाही. हे ज्ञान व सत्य या एका वसंताला प्राप्त झाले नाही, तर वसंतमय विश्वामधून त्याची उत्पत्ती झाली आहे. संपूर्ण वसंतमय विश्व सत्य आणि ज्ञान यांनी भरून गेले आहे. 
            या वसंताचा जन्म धनुश (धनु )लग्नावर झाला. धनु रास ही उच्चीची रास आहे. धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे तिचे जीवन एकाग्रतेने स्वामींच्या दिशेने जात आहे. सत्ययुगात भूतलावर जन्म घेणाऱ्या सर्वांचे धनु लग्न असेल. सर्वजण परमेश्वराच्या दिशेने जातील. माझी जन्मरा स तूळ आहे. सर्वजण माझ्यासारखेच असतील. ते जीवनात सदाचरण आणि न्याय यांची कास धरतील. हे हेच दर्शविते. या एका वसंताने मिळवलेले सत्य आणि ज्ञान संपूर्ण वसंतमय विश्वामध्ये भरून राहील. अखिल वसंतमय विश्वाची नाडी या एका वसंताच्या नाडीसारखी असेल. प्रत्येक जण ईश्वरमय जीवन जगेल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम   

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

          " जेव्हा भक्त केवळ परमेश्वरासाठी जीवन व्यतीत करतो तेव्हा परमेश्वर स्वतः त्या भक्ताचा शोध घेत येतो. "

सूत्र सातवे

वेग

           माझ्या अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. का बरं ? स्वामी माझ्याशी का बोलले नाहीत ? मला इथे राहण्यासाठी का बरं स्थान नाही ? त्यांनी मला का बोलावलं नाही ? अशी कुरकुर करू नका. मला तुमची काळजीच नाही किंवा मी तुम्हाला ओळखत नाही असे समजू नका. मी कदाचित तुमच्याशी बोलत नसेन परंतु याचा अर्थ असा नाही की, मला तुमच्याविषयी प्रेम नाही. 
             पुस्तकाचे मधलेच एखादे पान उघडल्यावर हाती आलेला चपखल पुरावा पाहून मी चकित झाले. मी त्वरित स्वामींना धन्यवाद दिले आणि पुन्हा लिहिण्यास सुरुवात केली. माझ्या मनात नेहमी हे तीन प्रश्न येतात -
१) तुम्ही मला कधी बोलावणार ?
२) तुम्ही माझ्याशी कधी संभाषण करणार ?
३) तुम्ही मला प्रशांतीमध्ये कधी जागा देणार ?
             स्वामींनी १० ऑक्टोबर १९६४ या दिवशी दिलेला संदेश सत्य साई स्पीक्स मध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यावेळी मला स्वामींविषयी काहीही माहित नव्हते आणि त्या संदेशामध्ये माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरे मला मिळाली. 
*  *  *

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " आपण प्रत्येक गोष्ट परमेश्वराला अर्पण करून सर्व इच्छावासनांपासून रिक्त झाले पाहिजे आणि नंतर स्वतःला पूर्णपणे समर्पित केले पाहिजे."

सूत्र सातवे 

वेग

               महाविष्णूंच्या चरणांमधून गंगेचा उगम झाला आहे. संपूर्ण विश्वाला तिच्यासारखे शुद्ध बनवून ती पुन्हा महाविष्णूंच्या चरणांमध्ये विलीन होते. या दरम्यानच्या काळात तिला किती त्रास सहन करावा लागतो ? तिचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी तिने किती पुरावे द्यायला हवेत ? तिच्या वेगळा बांध घालण्यासाठी तिच्या मार्गात किती अडथळे येतात ? ध्यानामध्ये मी स्वामींनी विचारले, " यापूर्वी तुम्ही मला 'आता सात दिवस ' याविषयी सांगितले. ते काही घडले नाही. कोडाईकॅनलबद्दल सांगितले तेही घडले नाही. तुम्ही मला खरंच बोलावणार आहात का ? माझ्याशी बोलणार आहेत का ? मला तुमच्या चरणांना स्पर्श करता येईल का ? " स्वामी उत्तरले," मी तुला निश्चित बोलावणार आहे. " 
              स्वामींच्या फोटोसमोर बसून मी अश्रू ढाळत असता माझ्या मनात हे विचार घोळत होते." जर हे खरे असेल तर तुम्ही मला पुरावा द्या." मी सत्य साई स्पीक्स (खंड ४ था ) काढले आणि वाचले -
              " परमेश्वराच्या प्रेमाबद्दल कधीही किंतु अथवा शंकेला थारा देऊ नका. त्याच्या प्रेमाची परीक्षा करण्यासाठी प्रश्नही विचारू नका. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " हे विश्व म्हणजे माया आहे त्यामध्ये न अडकता केवळ परमेश्वराच्या विचारात राहा व त्याच्यासाठी जीवन व्यतीत करा."

सूत्र सातवे 

वेग 

             उपनिषदे लिहिणाऱ्या या आत्मसाक्षात्कारी महात्म्यांना परमेश्वराने प्रमाणपत्रे बहाल केली नव्हती. स्वामी मला म्हणाले," तुझे सत्य आणि ज्ञान यावर विश्वास न ठेवणाऱ्या अज्ञानी लोकांविषयी तू का चिंता करतेस ? प्रयत्न करूनही गंगेचा ओघ कोणी थांबवू शकणार नाही ! जरी कोणी एखाद्या ठिकाणी थांबवायचा प्रयत्न केला तर तो दुसऱ्या बाजूने वाहू लागतो. समुद्राला जाऊन मिळवण्यासाठी तो अनेक मार्ग शोधून काढतो. शुद्धतेमुळे गंगेच्या प्रवाहाला प्रचंड वेग आहे. पावित्र्य तिची शक्ती आहे, प्रेम जीवप्रवाह आहे. 
              सर्व संघर्षांना तोंड देऊन अखेरीस तिचा प्रवाह मोठ्या वेगाने सागराच्या दिशेने धावतो. महासागर तिचे स्वागत करण्यासाठी पुढे येतो, किनाऱ्याची मर्यादा उल्लंघून आपल्या  लहरीरुपी करांनी गंगेला आलिंगन देतो. आता गंगा सागराच्या तळाशी आहे. 
              त्याचप्रमाणे या प्रेमगंगेचा वेगही कोणी थांबवू शकणार नाही. तिचा साईमहासागराशी संयोग झालाच पाहिजे. ' भगवंताचे अखेरचे सात दिवस ' या पुस्तकामध्ये स्वामींनी हे उदाहरणाद्वारे दर्शवले आहे. जेव्हा आमचे विमान पुट्टपर्तीला येते तेव्हा मला घेऊन जाण्यासाठी स्वामी विमानतळावर माझी वाट पाहतात. 
             साईमहासागरामध्ये वसंतगंगेचे विलयन होण्यासाठी साईमहासागर स्वतःच पुढे येतो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" चेहरा मनाचा आरसा आहे म्हणून सदैव आनंदी रहा."

सूत्र सातवे 

वेग 

           कृष्णानेही सांगितले," मी व्यास आहे." उच्च ज्ञान प्राप्त करणे एवढे सुलभ आहे का ? त्यासाठी महान तपोबलाची आवश्यकता आहे. ही साधारण तपश्चर्या नसून घोर तपश्चर्या आहे. ज्यामुळे ईशस्तिथी प्राप्त होते. 
           ब्रह्मसूत्रामध्ये ईशस्थितीचे वर्णन केले आहे. महाभारतामध्ये जीवन जगण्याची कला दर्शवली आहे. खरं तर जीवन कसे जगावे व कसे जाऊ नये याचे मार्गदर्शन महाभारत करते. ह्या महाकाव्यात अनेक उपदेश आहेत. 
            भगवद्गीता माणसाच्या मनाचे वर्णन करते. मनावर विजय मिळवून मानव माधव कसा होऊ शकतो हेही सांगते. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये चालणारा अंतर्गत संघर्ष गीता उघड करून दाखवते. हा सत्य -असत्य आणि धर्म -अधर्म यातील संघर्ष आहे. व्यासांनी उदाहरणे देऊन आदर्श जीवन कसे जगावे हे दर्शवल्यामुळे आपण त्यांना भगवान म्हणतो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम