शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

जन्मदिन संदेश

भगवान बाबांशी संदेश कसा साधायचा?

            इतक्या काळज्या, इतक्या समस्या, माझी तब्येत बरी नाही, मी श्रीमंत नाही, माझी इतरांकडून उपेक्षा केली जाते, माझे लग्न झाले नाही, मला मुलेबाळे नाहीत ..... भगवान माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत. का ? का ? माझ्या प्रार्थना ऐकू जातील इतक्या अंतरावर ते आहेत का ? का त्यांना माझ्या समस्या सोडवण्यात काही स्वारस्य नाही ?
             तुम्हाला असं वाटतं का की भगवान कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही स्वामींपासून दूर आहात ? नाही, नाही ..... मी दुसरीकडे कोठे नाही मी तुमच्या पासून दूर नाही. मी तुमच्या प्रार्थनांना प्रतिसाद देण्याचे टाळले नाही.
             एक गोष्ट ऎका हे जग हे कलियुग नकारात्मकतेने भरलेले आहे. मनुष्य त्याला परमेश्वराकडून काहीतरी हवे किंवा त्याच्या समस्यांचे निराकरण करण्याची प्रार्थना करण्यासाठी मंदिरांमध्ये धावत असतो. तुम्हाला असं वाटत का की भगवान म्हणजे तुम्हाला सतत हव्या असणाऱ्या गोष्टींचा विक्रेता आहे ? मी तुम्हाला कोणतीही गोष्ट विकण्यासाठी येथे  आलो नाही. तुम्ही माझ्याकडे कोणतीही गोष्ट मागण्याची गरज नाही. वासरांसाठी नेहमीच गाय दूध तयार ठेवते. वासरे दूध पिण्यासाठी कधीही तिची परवानगी घेत नाहीत वा तिला विंनती करत नाहीत. तुमची श्रद्धा आणि मी तुमच्यामध्ये असल्याची तुम्हाला समज असूनही तुम्ही प्रार्थना का करता ? स्वामी, मला हे हवे, असे माझ्याकडे मागण्याची गरज नाही.
            तुम्ही तुमच्या अंतरात माझ्याशी संवाद साधा प्रत्येक बाबतीत माझ्याशी चर्चा करा. जर तुम्हाला माझ्याकडून उत्तर मिळाले नाही तर माझ्याशी भांडा. तुम्हाला सर्व हक्क स्वाधीन आहेत कारण तुम्ही माझी प्रिय लेकरे आहात. आज मी तुम्हाला एक गुपित सांगतो. पहाटेच्या वेळी तुमच्या बिछान्यातून उठा आणि अंतरात मला सुप्रभात म्हणा आणि मग तुमचा दिवस सुरु करा. रात्री मला शुभरात्री म्हणून झोपा. ह्याचा सराव केल्याने तुम्हाला स्वामींच्या खूप जवळ असल्यासारखे वाटेल. सर्व दिवस शुभ आहेत. प्रत्येक क्षण स्वामींनी आशीर्वादित केलेला आहे. मग तुम्ही म्हणाल की मी स्वामींना सुप्रभात, शुभरात्री का म्हणू? तुम्ही हे म्हणणे महत्वाचे नाही. आई जसे मुलाला ' अम्मा ' म्हणायला शिकवते, तसे तुम्ही मला प्रथम सुप्रभात व शुभरात्री म्हणा. हळूहळू तुम्ही माझ्याशी संवाद सुरु करा आणि मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याची मी तुम्हाला ग्वाही देतो.
             तुम्ही तुमची कंपने (Frequencies ) प्रथम माझ्याशी जुळवा, माझ्याशी सुसंवाद साधा मी तुम्हाला संकेत पाठवीन आणि तुम्ही माझा आवाज स्पष्ट ऐकू शकाल. समुद्र पाण्याने भरलेला असतो परंतु प्रचंड आकाराचे जहाज त्यावर तरंगते. त्या जहाजाच्या आता जर पाणी शिरले तर मात्र ते बुडते. नाकारात्मकताही अशीच आहे. माझ्यावर श्रद्ध ठेवा आणि तुमची जीवनयात्रा सुरु करा. जर तुमच्या मनात तिळमात्र शंका असेल तर तुमची जीवननौका बुडेल. भगवानांच्या सदैव अनुसंधानात राहा.
             मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला माझे आशीर्वाद लाभले नाहीत असा कधीही विचार करू नका. मी अगोदरच तुम्हाला आशीर्वाद दिले आहेत म्हणून तर तुम्ही माझे भक्त आहात. तुमच्या आनंदासाठी मी सदैव तुम्हाला आशीर्वाद देतो.

- भगवान श्री सत्य साई बाबा



जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा