ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प तेवीस
वेद - दृश्य आणि अदृश्य
एक दिवस आम्हाला दर्शनासाठी प्रथम क्रमांकाचे टोकन मिळाले पहिल्या ओळीत बसण्याचे टाळून मी दुसऱ्या ओळीत बसले. मला पहिल्या ओळीत बसून लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे नव्हते. माझा लहानपानापासूनच असा स्वभाव होता. मी स्वतःला इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न करते. हा ' मी ' आणि हा 'देह ' इतरांच्या दृष्ट्टीस पडू नये अशी माझी इच्छा असते.
हा देह इतरांपासून लपवून ठेवण्याची गोष्ट आहे. पूर्व जन्मातील चुका व इच्छांची निष्पत्ती म्हणजे जन्म होय. आपण हे जाणले पाहिजे की भौतिक सुखाचा आनंद लुटण्यासाठी हा देह दिला नसून परमेश्वर प्राप्त करून घेण्यासाठी साधना करण्याच्या हेतूने दिलेला आहे. देह धारण करणे ही एक लज्जास्पद गोष्ट आहे. जर आपण शुद्ध असतो तर परमेश्वराशी आपला योग झाला असता आणि आपण जन्म घेतला नसता. जन्म हा आपल्या अशुद्धतेचे द्योतक आहे.
आता आपण स्वामींचे उदाहरण पाहू. दर्शनाच्या वेळी जेव्हा स्वामी येतात तेव्हा त्यांच्या कफणीने त्यांचे संपूर्ण शरीर झाकलेले असते. आपणास केवळ त्यांचा चेहरा दोन तळहात व पावले दिसतात.
ह्या युगाचा अवतार आपणास अशी शिकवण देतो की देह ही अशी गोष्ट आहे की ती लपवून ठेवावी. आपला जन्म ही आपल्यासाठी शरमेची बाबा आहे. आपल्या मुर्खपणामुळे आपण जन्म घेतो.
जरी तुम्ही ह्या देहाला जडजवाहिरांनी सजवण्याचा प्रयत्न केलात तरी तो एक कचऱ्याचा डबा आहे. मानवी देह मूत्र, विष्ठा, लाळ, कफ आणि घाम ह्यासारख्या गोष्टींनी भरलेला आहे. मानवी मन हजारो जन्मांमध्ये संग्रहित केलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, आसक्ती ह्या सारख्या दुर्गुणांनी लिप्त आहे.
रुग्णास जेव्हा नैसर्गिक रितीने लघवी होत नाही तेव्हा तो कॅथेटर आणि पिशवीचा वापर करतो. त्याची पिशवी पाहून आपण अस्वस्थ होतो. तथापि ती बाहेर दिसणारी असून मूत्राशयासारखीच आहे. जी आपल्या दृष्टीआड असते. ते बाहेर दिसू लागताच किळसवाणे वाटते. ते आपल्या आतही नसते का ? अशा ह्या देह आणि मनाचे प्रदर्शन करण्यास आपल्याला शरम वाट्याला नको का ?
पुट्टपर्तीमधील समाधी रस्त्यावर असलेले कचऱ्याचे ढीग उचलण्यासाठी ट्रक येतो. तेथे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असल्याने लोकं नाकाला रुमाल लावून वेगाने पुढे चालत जातात. जरी कचरापेटीला बाहेरून हारतुऱ्यांनी सजवले, रेशमी कापडचे आच्छादन घातले सुगंधी अत्तराचे फवारे मारले तरी ती कचरापेटीच राहणार.
आपले शरीरही एक चालती फिरती कचरापेटीच आहे. आपण तिचे बाह्य रूप सजवून इकडे तिकडे फिरतो. ब्युटी पार्लरला भेट देऊन सौंदर्यवर्धन करतो. एखादी साडी घेण्यासाठी अनेक दुकानांमध्ये जातो. सराफाकडे जाऊन दागदागिने विकत घेतो. किती प्रकारांनी आपण स्वतःला सजवतो !
वास्तविक, ही देहरूपी कचरा पेटी ह्या भूतलावर कधीही दिसू नये आणि जर देह भूतलावर आला तर तो योग्य कपड्यांनी पूर्ण आच्छादित करावा. ह्या देहाने भूतलावर पुन्हा जन्म घेऊ नये म्हणून आपण साधना केली पाहिजे. आतमधील मलिनता काढून टाकण्यासाठी साधना केली पाहिजे. जर अशा तऱ्हेने आपण साधना केली तर आपल्या देहामध्ये परमेश्वरास क्रियाशील बनवणे आपल्याला शक्य होईल. मानवी तत्व बदलून ईश्वरी तत्व कार्यरत होऊ शकेल. ह्या वसंता नामक मानवी देहात दिव्य तत्व कसे कार्य करते हे स्तूप दर्शवतो.
जर परमेश्वराला क्रियाशील बनवायचे असेल तर देह शुद्ध आणि पवित्र बनवणे आवश्यक आहे. ह्या अवस्थेमध्ये जर स्वामींच्या दर्शन, स्पर्शन, संभाषणाची अनुभूती घेतली तर आपण पूर्णत्वास पोहोचतो.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' साई डायजेस्ट ' ह्या पुस्तकातून.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा