ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रथम साधना करून आपण मोक्ष प्राप्त केला पाहिजे आणि नंतर स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले पाहिजे."
सूत्र आठवे
भगवंत परतफेड करतो
आता आपण माझ्या जीवनावर नजर टाकूया. जन्मापासून मी केवळ परमेश्वरासाठीच जगते आहे, मला त्याच्या सहवासात जीवन जगण्याची इच्छा आहे. मला त्याच्याशी विवाह करायचा आहे. मी त्याच्या जवळिकीसाठी तळमळते आहे. माझे संपूर्ण जीवन अश्रूमय आहे. माझ्या मनात आता जे भाव आहेत, त्यांची प्रतिक्रिया, प्रतिबिंब व प्रतिध्वनी म्हणून स्वामी पुन्हा अवतार घेणार आहेत. माझी तळमळ, माझे अश्रू आणि माझी त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा याचा ते अनुभव घेतील. प्रेमसाई अवतार केवळ एवढ्यासाठीच आहे. भविष्यात काय घडेल हे कोणालाच माहित नसते. तथापि प्रेमसाई अवतारात काय घडेल ते मला माहीत आहे. आता स्वामींबरोबर ध्यानामध्ये मी जे जे काही अनुभवते आहे ते पुढील अवतारात मी सदेह अनुभवणार आहे.आता जे ध्यानात आहे ते पुढे भौतिकदृष्ट्या घडेल.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा