ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" हे विश्व म्हणजे माया आहे त्यामध्ये न अडकता केवळ परमेश्वराच्या विचारात राहा व त्याच्यासाठी जीवन व्यतीत करा."
सूत्र सातवे
वेग
सर्व संघर्षांना तोंड देऊन अखेरीस तिचा प्रवाह मोठ्या वेगाने सागराच्या दिशेने धावतो. महासागर तिचे स्वागत करण्यासाठी पुढे येतो, किनाऱ्याची मर्यादा उल्लंघून आपल्या लहरीरुपी करांनी गंगेला आलिंगन देतो. आता गंगा सागराच्या तळाशी आहे.
त्याचप्रमाणे या प्रेमगंगेचा वेगही कोणी थांबवू शकणार नाही. तिचा साईमहासागराशी संयोग झालाच पाहिजे. ' भगवंताचे अखेरचे सात दिवस ' या पुस्तकामध्ये स्वामींनी हे उदाहरणाद्वारे दर्शवले आहे. जेव्हा आमचे विमान पुट्टपर्तीला येते तेव्हा मला घेऊन जाण्यासाठी स्वामी विमानतळावर माझी वाट पाहतात.
साईमहासागरामध्ये वसंतगंगेचे विलयन होण्यासाठी साईमहासागर स्वतःच पुढे येतो.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा