गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

          " जेव्हा भक्त केवळ परमेश्वरासाठी जीवन व्यतीत करतो तेव्हा परमेश्वर स्वतः त्या भक्ताचा शोध घेत येतो. "

सूत्र सातवे

वेग

           माझ्या अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. का बरं ? स्वामी माझ्याशी का बोलले नाहीत ? मला इथे राहण्यासाठी का बरं स्थान नाही ? त्यांनी मला का बोलावलं नाही ? अशी कुरकुर करू नका. मला तुमची काळजीच नाही किंवा मी तुम्हाला ओळखत नाही असे समजू नका. मी कदाचित तुमच्याशी बोलत नसेन परंतु याचा अर्थ असा नाही की, मला तुमच्याविषयी प्रेम नाही. 
             पुस्तकाचे मधलेच एखादे पान उघडल्यावर हाती आलेला चपखल पुरावा पाहून मी चकित झाले. मी त्वरित स्वामींना धन्यवाद दिले आणि पुन्हा लिहिण्यास सुरुवात केली. माझ्या मनात नेहमी हे तीन प्रश्न येतात -
१) तुम्ही मला कधी बोलावणार ?
२) तुम्ही माझ्याशी कधी संभाषण करणार ?
३) तुम्ही मला प्रशांतीमध्ये कधी जागा देणार ?
             स्वामींनी १० ऑक्टोबर १९६४ या दिवशी दिलेला संदेश सत्य साई स्पीक्स मध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यावेळी मला स्वामींविषयी काहीही माहित नव्हते आणि त्या संदेशामध्ये माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरे मला मिळाली. 
*  *  *

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा