ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण प्रत्येक गोष्ट परमेश्वराला अर्पण करून सर्व इच्छावासनांपासून रिक्त झाले पाहिजे आणि नंतर स्वतःला पूर्णपणे समर्पित केले पाहिजे."
सूत्र सातवे
वेग
महाविष्णूंच्या चरणांमधून गंगेचा उगम झाला आहे. संपूर्ण विश्वाला तिच्यासारखे शुद्ध बनवून ती पुन्हा महाविष्णूंच्या चरणांमध्ये विलीन होते. या दरम्यानच्या काळात तिला किती त्रास सहन करावा लागतो ? तिचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी तिने किती पुरावे द्यायला हवेत ? तिच्या वेगळा बांध घालण्यासाठी तिच्या मार्गात किती अडथळे येतात ? ध्यानामध्ये मी स्वामींनी विचारले, " यापूर्वी तुम्ही मला 'आता सात दिवस ' याविषयी सांगितले. ते काही घडले नाही. कोडाईकॅनलबद्दल सांगितले तेही घडले नाही. तुम्ही मला खरंच बोलावणार आहात का ? माझ्याशी बोलणार आहेत का ? मला तुमच्या चरणांना स्पर्श करता येईल का ? " स्वामी उत्तरले," मी तुला निश्चित बोलावणार आहे. "
स्वामींच्या फोटोसमोर बसून मी अश्रू ढाळत असता माझ्या मनात हे विचार घोळत होते." जर हे खरे असेल तर तुम्ही मला पुरावा द्या." मी सत्य साई स्पीक्स (खंड ४ था ) काढले आणि वाचले -
" परमेश्वराच्या प्रेमाबद्दल कधीही किंतु अथवा शंकेला थारा देऊ नका. त्याच्या प्रेमाची परीक्षा करण्यासाठी प्रश्नही विचारू नका.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा