गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" आपण इथेच, याक्षणी मुक्ती  प्राप्त करू शक्तो."

सूत्र सातवे 

वेग

            जर ही एक वसंता परमेश्वर आहे तर समग्र वसंतमयम् प्रपंचही परमेश्वर आहे, ईश्वर आहे, प्रभू आहे. 
            इथे कोणीलाही इतरांसाठी स्वतःचे सत्य प्रस्थापित करण्याची गरज नाही. मी ईश्वर आहे, तुम्ही ईश्वर आहात, आपले प्रज्ञान ईश्वर आहे. सर्वजण समान आहेत. यालाच म्हणतात, ' अहं ब्रम्हास्मि ', 'तत् त्वम असि ', 'अयं आत्मब्रम्ह, प्रज्ञानं ब्रम्ह ' सर्वांना ही स्थिती प्राप्त होईल तेव्हाच माझ्या प्रेमाचा वेग स्वामींमध्ये विलीन होईल. 
             माझ्या नाडीमध्ये असे म्हटले आहे की,            परमेश्वरप्राप्तीसाठी एकमेव तत्व म्हणून मी प्रेममार्गाचा पुरस्कार करेन. प्रेममार्गाने परमेश्वर प्राप्ती होईल. हे प्रेमसूत्र आहे. ही वसंताची जन्मकुंडली सर्वांची जन्मकुंडली असेल. वसंताची नाडी सर्वांची नाडी असेल, माझी लग्नरास, जन्मरास, नक्षत्र जे असेल तेच सर्वांचे असेल, मी जशी आहे तसे वसंतमय विश्व असेल. एक वसंता जर परमेश्वर आहे तर सर्वजण परमेश्वर आहेत. स्वामी नेहमी म्हणतात," मी परमेश्वर आहे. तुम्हीही परमेश्वर आहात. सर्वजण परमेश्वर आहेत." तरी कोणालाही याचे आकलन होत नाही. आता माझ्या जीवनातून मी हे सर्वांना दाखवत आहे. मी परमेश्वर आहे, तुम्ही परमेश्वर आहात. वसंतमयम्द्वारे मी हे सिद्ध करत आहे की, मी परमेश्वर आहे, तुम्ही परमेश्वर आहात. हे सत्ययुग आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा