ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" चेहरा मनाचा आरसा आहे म्हणून सदैव आनंदी रहा."
सूत्र सातवे
वेग
ब्रह्मसूत्रामध्ये ईशस्थितीचे वर्णन केले आहे. महाभारतामध्ये जीवन जगण्याची कला दर्शवली आहे. खरं तर जीवन कसे जगावे व कसे जाऊ नये याचे मार्गदर्शन महाभारत करते. ह्या महाकाव्यात अनेक उपदेश आहेत.
भगवद्गीता माणसाच्या मनाचे वर्णन करते. मनावर विजय मिळवून मानव माधव कसा होऊ शकतो हेही सांगते. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये चालणारा अंतर्गत संघर्ष गीता उघड करून दाखवते. हा सत्य -असत्य आणि धर्म -अधर्म यातील संघर्ष आहे. व्यासांनी उदाहरणे देऊन आदर्श जीवन कसे जगावे हे दर्शवल्यामुळे आपण त्यांना भगवान म्हणतो.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा