गुरुवार, ३० जुलै, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " आपण का जन्मलो ? मी कोण आहे ? यावर पुन्हा पुन्हा विचार करा. "

भाग - नववा 

आत्मगीते 

          वेगवेगळ्या देवांना उद्देशून मी लिहलेली गीते हेच दर्शवतात की अनेक नावांनी ओळखला जाणारा तो एकच आहे. 
          सुरुवातीला मी माझे भाव गीतांमधून आणि कवितांमधून व्यक्त केले. आता स्वामींनी पुस्तकरूपात भाव व्यक्त करायला सांगितले. प्रथम मी कृष्णावर कविता केल्या. त्यानंतर स्वामी माझ्या जीवनात आले. माझ्या जीवनात घडलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगाने कवितेचे रूप धारण केले. स्वामींनी माझ्या पहिल्या पत्राचा स्वीकार केल्यानंतर मी त्यावर १०० ओव्यांचे काव्य केले. आमच्या घरात स्वामींच्या फोटोवर पहिल्यांदा विभूती साक्षात झाली तेव्हा मी १०० कविता केल्या. त्यांच्या पादुकांची प्रतिष्ठापना झाल्यावर १०० कविता, पहिला पादनमस्कार मिळाल्यावर १०० कविता. स्वामींचे चमत्कार ज्या घरांमध्ये होत अशा अनेक घरी मी जात असे. मी माझे विविध अनुभव १०० कवितांमधून लिहिले आहेत; आणि शेवटी मी स्वामींवर १०० कविता रचल्या. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम   

रविवार, २६ जुलै, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" सर्वांवर प्रेम करा ..... हा तुमचा मंत्र बनवा. "

भाग - नववा 

आत्मगीते 

कांचीवरदा 

आसू अन हासू सारे तुझेच चिंतन 
क्षण न् क्षण, प्रत्येक भाव तुझेच आराधन 
काय जादू केलीस तू मजवरी 
जिंकोनी घेतलेस मज पूर्णत्वाने 
अन्य काही प्रयोजन असेल का तेथे ?
जीवनामागून जीवन
जन्मामागून जन्म
शरणागत मी तव चरनांशी 

उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम

गुरुवार, २३ जुलै, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " समस्या धावत्या मेघांसारख्या असतात. केवळ भक्ती म्हणजेच मुक्ती होय. "

भाग - नववा 

आत्मगीते 

गुरुवायूरचा भगवान कृष्ण 
हे गुरुवायूरपूर श्रीहरी कृष्णा 
कोण बनून दूत 
सांगेल त्या प्रभुवरास 
मम प्रेमाचा उत्कट आवेश 
रोमांचित देह, ब्रम्हानंदी लीन 
ईशप्राप्ती माझ्या अस्तित्वाचे प्रयोजन 
सर्वव्यापी प्रभुपरमेश्वर 
जाणत नाही का माझी अवस्था ? 

            ज्या दिवशी आत्मचरित्रासाठी मी ही कविता निवडली त्या दिवशी एक भक्त गुरुवायूरच्या श्रीहरीचा फोटो घेऊन आले. मी म्हणाले, " त्याला निश्चितच माझी मनोदशा माहीत आहे."

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

पुष्प - ३१

कर्मयोग - उपाय 

           कर्मयोग हा कर्मकायद्याचा अनुभवसिद्ध उपाय आहे. कर्म म्हणजे काय ? आपण करीत असलेली प्रत्येक कृती म्हणजे कर्म. योग म्हणजे परमेश्वराशी जोडणे. सर्वसाधारण कृती योगात परिवर्तित करणे म्हणजे कर्मयोग. कृती योगात परिवर्तित करणे म्हणजे काय ? याचा अर्थ असा की परिणामांचे ओझे  न वाहता केलेले कर्म. जेव्हा तुम्ही सर्व कर्म परमेश्वराची पूजा म्हणून कराल तेव्हाच तुम्हाला खरी मनः शांती मिळेल.
           आपण स्वतःला सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठीच जन्मास आलो आहोत. सगळी कर्म योगात परिवर्तित करून आपण मुक्ती प्राप्त करू शकतो. कोण कोणाचा नातेवाईक ? कौटुंबिक जीवन हे आगगाडीच्या प्रवासाप्रमाणे आहे. प्रवासी एकमेकांशी हसत, खेळत, बोलत एकत्र प्रवास करतात; प्रत्येकाचे स्टेशन आले की ते वेगवेगळ्या मार्गांनी जातात. त्या कुटुंबात असेपर्यंत प्रत्येकाने बंधनात न अडकता आपली कर्तव्ये परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनी पार पाडावी.
           सर्व नाती फसवी आहेत. फक्त परमेश्वर शाश्वत आहे. तोच आपला खराखुरा नातलग आहे. त्यालाच आपला समजून कर्म करीत राहणं हाच कर्मयोग आहे. '  कर्ता आहे ' या भावनेने केलेल्या कर्माचे पाश होतात, परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने केलेल्या कर्माचा योग होतो. अशाप्रकारे, भावना हेच बंधन किंवा मुक्तीचे कारण असते.
            कर्म हा मनाचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे. एकांतात मन शांत असल्यासारखे वाटते. जेव्हा आपण इतरांबरोबर काम करतो, तेव्हा लपलेले भाव उफाळून वर येतात. समोरचा माणूस आपल्या मताशी सहमत झाला नाही तर क्रोध आणि नाराजी उद्भवते. अशावेळी एकांतात अनुभवलेली शांती कुठे जाते ?
           आरशात पाहताना जर आपल्याला चेहऱ्यावर काळा डाग दिसला तर स्वतःशीच आरशाचे आभार मानून,' धन्यवाद ! मी जर अशीच बाहेर गेले असते तर माझा चेहरा पाहून सर्वजण मला हसले असते.' असे पुटपुटत तोंड धुतो. त्याचप्रमाणे, जे आपले दुर्गुण दाखवतात, त्यांच्यावर आपण रागवता कामा नये, उलट त्यांचे आभार मानावेत. ' तुमचे मन शुद्ध करा, स्वतःमध्ये बदल घडवून आणा.' कुठल्याही घटना, माणसे किंवा गोष्टीत गुंतून भावनांच्या आहारी जाऊ नका. इच्छा हेच भावनांच्या उत्पत्तीचं मूळ कारण आहे. आपलं मन कुठल्याही इच्छांमध्ये गुंतू न देण्याविषयी आपण जागरूक रहायला हवे. दुसऱ्याने निदर्शनास आणलेले आपले दोष आपण मान्य करत नाही, तेव्हा आपण जन्ममृत्युच्या चक्रात अडकतो. ते मान्य करून आपण स्वतःला बदलले नाही तर आपण मुक्त कसे होणार ? एखादा आपली चूक निदर्शनास आणतो, तेव्हा आपला अहंकार ती मान्य न करता तक्रार करून भांडतो. 

जय साईराम  

रविवार, १९ जुलै, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       " आपले विधिलिखित ब्रह्मदेव लिहीत नसून आपले आपणच लिहितो. "

भाग - नववा

आत्मगीते 

परमेश्वर आला वास्तव्यास 
माझ्या हृदयमंदिरी 
वाग्बाण बनले मधुर मधाळ 
कोठे आहे अज्ञान ?
कोठे आहे मन ?
कोठे आहे संभ्रम ?
ही सारी किमया त्या करुणाघनाची 
हे कोण जाणते ?
हे कोण जाणते ?
*

कोरीले तव रूप मी मम हृदयी 
हे माधवा, मथुराधिपते !
शोधिता मी अन्य आश्रय 
थट्टा करिती जन तुझी नी माझी 

             ह्या दोन गीतांमधून माझ्यामध्ये परिवर्तन कसे घडले हे दिसून येते. सहस्रनामधारक परमेश्वर माझ्याशी एकरूप माझ्या सर्व कर्मांचा नाश झाला. संपूर्ण विश्व मला आपलेसे वाटू लागले. हे विश्वचि माझे घर, सर्वजण माझे आप्तस्वकीय ही भावना मनात निर्माण झाली. परमेश्वराने माझ्या हृदयात प्रवेश करताक्षणीच ही किमया घडून आली. मायेचा अंधःकार, मनाचे अज्ञान दूर झाले. सर्वत्र माधुर्य भरून राहिले. ही त्या परमेश्वराचीच कृपा आहे. 
*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

गुरुवार, १६ जुलै, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रत्येक गोष्टीत चांगले पाहा तोच परमेश्वर होय. " 

भाग - नववा 

आत्मगीते 

कूडलळगर 

सहस्रनामधारी प्रभुवराशी 
योग झाला माझ्या जीवनाचा 
संहार झाला माझ्या अनंत कर्मांचा 
केवढे हे आश्चर्य ! बदलून गेले सारे काही 
मज उमगले सत्य, सारे विश्वचि माझे आप्त 
ही कृपा त्या प्रभुवरची, प्रभुवरची. 

          अशा अनेक कविता मी लिहिल्या आहेत. मी अत्यंत प्रेमाने परमेश्वाचा महिमा गायला आहे. मी त्याच्या चरणांशी संपूर्ण शरणागती पत्कारली आहे. माझे रक्षण करण्यासाठी मी त्याच्या विनवण्या केल्या आहेत. त्याने मला योग्य मार्गावर आणावे यासाठी अश्रू ढाळले आहेत. माझ्यामध्ये बदल घडव असे त्याला सांगण्याऐवजी मी कवितांमधून माझे भाव व्यक्त केले आहेत कारण माझ्या हाकांना प्रतिसाद मिळत नव्हता.
 
*

परमेश्वर आला वास्तव्यास 
माझ्या हृदयमंदिरी 
वाग्बाण बनले मधुर मधाळ 
कोठे आहे अज्ञान ?
कोठे आहे मन ?
कोठे आहे संभ्रम ?
ही सारी किमया त्या करुणाघनाची 
हे कोण जाणते ?
हे कोण जाणते ?

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १२ जुलै, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

   " कुटुंबाशी असणारे बंध पुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत होतात. परमेश्वराशी असणारे बंध मोक्ष प्रदान करतात."

भाग - नववा 

आत्मगीते 

वध केलास तू बलाढ्य असुरांचा 
मारीलेस तू दुष्ट पुतनेस 
केलेस कालिया मर्दन 
युद्ध करून, केलास नष्ट भूमीभार 
कृत्ये ही आहेत का महान ?
या दुष्ट, दुराचारी जीवात घडवलेस परिवर्तन 
तरच तू खरा महान ! 

          अनेक असुरांना मारण्याचे कृत्य असो, दुष्ट पूतनेचा वध असो व महाभारत युद्धाचा विजय असो, ही काही त्याच्या शक्तीचे सामर्थ्य दर्शवणारी उत्तम उदाहरणे नाहीत. जर त्याने माझा दुष्ट अन विखारी मनाला बदलवले तरच तो खरा शक्तिशाली आहे असे म्हणता येईल. 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ९ जुलै, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

        " परमेश्वराला तुमच्यामध्ये प्रस्थापित करा. तुम्ही परमेश्वरमध्ये प्रस्थापित व्हा. "

भाग - नववा 

आत्मगीते 

युद्ध केलेस तू चाणूराशी, तेनुकाशी, शकटासुराशी 
पराजित केलेस बाणासुरासी 
या पराक्रमांची महती ती काय ?
जर नाही घडवलेस परिवर्तन या क्षुद्र जीवात 
हे परमेशा, कलंकित होईल नाम तुझे भूतली 
केवढे हे लांच्छन !

           असुरांना मारणे हा काही पराक्रम म्हणता येत नाही. जर परमेश्वराने माझ्यात बदल घडवला नाही तर त्याचेच नाव कलंकित होईल. जर तो मला योग्य मार्गावर आणू शकत नसेल तर त्याचे सामर्थ्य लांच्छनास्पद आहे. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ५ जुलै, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " प्रेम हे नाम, रूप, स्थळ आणि काळ या सर्वांच्या पलीकडे आहे. "

भाग - नववा 

आत्मगीते 

मध्यरात्री प्रवेश केलास तू नंदघरी, महद्आश्चर्य !
कपटवेषधारी असुरांचा केलास तू वध, महद्आश्चर्य !
ह्या दीन जीवाच्या कर्मसंहारास सहाय्य न केलेस तू,
तर जग काय म्हणेल हे महाप्रभू ?

           कृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरुंगात झाला अन् मध्यरात्री त्याला नंदाच्या घरी नेले गेले. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले. वसुदेव आणि देवकीच्या हातांतल्या बेड्या गळून पडल्या. यमुनेने मार्ग दाखवला. आदिशेषाने पावसापासून त्याचे रक्षण केले. यशोदेचे तान्हुले आणि कान्हा यांची अदलाबदल करण्यात आली. वेगवेगळी रूपे धारण केलेल्या अनेक असुरांचा वध करून त्याने अनेक लीला दाखवल्या. माझ्या कर्मांचा संहार करण्यासाठी तो आपली लीला दाखवणार नाही का ? जर त्याचे सामर्थ्य व लीला मला बदलावयास उपयोगी ठरले नाही तर जग त्याच्या महिमेवर विश्वास ठेवणार नाही. सर्वजण त्याची चेष्टा करतील. 

*

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

गुरुपौर्णिमा संदेश 

          ब्रम्हाने एका विशिष्ट कार्यासाठी सत्यसाईंच्या रूपाने मानवी देह धारण केला आहे. तथापि प्रत्येक जीवाद्वारे कार्यरत असणारे ब्रम्ह हे सत्यसाई ब्रम्हाहून वेगळे आहे. प्रत्येक जीव हा त्याच्या आध्यात्मिक उन्नतीनुसार, त्यांच्या आत्मनिवासी ब्रम्हाची अनुभूती घेतात व त्याला जाणतात. जरी स्वामी मला सांगतात ती सत्य मी प्रकट करत असले तरी ती सर्वांना समजतात असे नाही. त्यांच्या उन्नतीच्या पातळीनुसार त्यांना त्याचे आकलन होते. 
           श्री सत्यसाई बाबा राधेला दिलेल्या वराची परिपूर्ती करण्यासाठी व आध्यात्मिक क्रांती घडवण्यासाठी येथे आले आहेत. त्यांच्या कृती अशा आहेत की ज्यायोगे ह्या दोन्ही कार्यांची पूर्तता होईल. सर्व त्यांच्या इच्छेनुसारच घडल. 
          स्वामींना भूत, वर्तमान आणि भविष्य ज्ञात आहे व ते त्यानुसार कृती करतात. त्यांच्या विश्व नाट्यामध्ये काय, केव्हा आणि कसे उघड करायचे हे ते जाणतात. ह्या तिन्ही काळांविषयी मी अनभिज्ञ आहे. मला फक्त एक आणि एकच गोष्ट माहित आहे ती म्हणजे माझे प्रभु सत्यसाई आणि माझे त्यांच्याप्रती प्रेम. 
           मी वेद, उपनिषदे वा अन्य धर्मग्रंथांमधून ब्रम्हज्ञान प्राप्त केले नाही. तर मी ते प्रेममार्गाद्वारे प्राप्त केले आहे. जर आपण प्रेममार्गावरून वाटचाल केली तर आपण आपल्या विशुद्ध प्रेमाने परमेश्वराला बद्ध करू शकतो. परमेश्वर जो कोणत्याही दोरीने बांधला जाऊ शकत नाही त्याला प्रेमाच्या धाग्याने बांधता येते. 
           माझा असा अनुभव आहे की प्रेमाला सत्याहून अधिक स्वातंत्र्य असते. प्रेमाला कोणाचेही भय नाही. ते त्याच्या इच्छेनुसार स्वतःला प्रकट करण्यास मुक्त असते. त्याला त्याच्या पसंतीनुसार, कोणत्याही प्रकारे परमेश्वरावर प्रेमवर्षाव करण्याची मोकळीक असते मग चुकीचे आहे वा बरोबर आहे ह्याचा ते विचारही करत नाही. 
           सत्य प्राप्तीसाठी प्रेममार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे . वेद व अन्य धर्मग्रंथांपेक्षा हा खूप सोपा आहे. जगाला हा मार्ग दाखवण्यासाठी आम्ही येते आलो आहोत. सत्य हेच ब्रम्ह आहे. सत्याच्या प्राप्तीसाठी प्रेममार्गाचे अनुसरण करा. जर आपल्याकडे प्रेम असेल तर ब्रम्ह आपलेच आहे असे समजा.

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' Bliss, Bliss, Bliss Part -2 '  ह्या पुस्तकातून. 



जय साईराम  

गुरुवार, २ जुलै, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " खऱ्या खऱ्या प्रेमाला देह अथवा विवाहाची आवश्यकता नसते केवळ भावना पुरेशा असतात."

भाग - नववा 

आत्मगीते 

तिरुमोखूरचा परमेश्वर 

पौर्णिमेच्या चंद्राचा हट्ट धरणाऱ्या बालकासम 
हट्ट धरिते मी तव दर्शनाचा 
विनविते तुज, 
ह्या जीवनाची अखेर होण्यापूर्वी 
दर्शन दे एकवार मज 
आप्तजनास रुचे ना हेका 
हा आर्त आक्रोश केवळ तव चरणांसाठी 
रक्षिलेस ना तू मजसी 
विषय उपहासाचा होशी. 

           पौर्णिमेच्या चंद्राचा हट्ट धरणाऱ्या लहान बालकासारखी मी रडते आहे. मला फक्त परमेश्वराचे दर्शन हवे आहे. माझ्या आप्तस्वकीयांना माझी मनोदशा समजत नाही. त्यांना माझा हा हेका आवडत नाही. त्याने जर मला चरणकमल दर्शन दिले नाही तर सर्व काही उपहासास्पद आहे. मी हे लिहित असताना स्वामींनी माझ्या हातात पौर्णिमेचा चंद्र दिला त्या अलौकिक दृश्याची मला आठवण झाली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम .....