रविवार, १० एप्रिल, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
       " दिव्यत्व आपला खरा स्वभाव आहे, हे सत्य जाणून कोणत्याही गोष्टीने संभ्रमित न होणे ज्ञानाचे सौंदर्य आहे." 
प्रेम निरपेक्ष असते 

             एक व्यक्ती मरणशय्येवर असून मृत्युशी झुंज देत आहे. दिवस जातात पण जीव त्याला सोडत नाही. त्याचे नातेवाईक म्हणतात, " त्याला काहीतरी हवे आहे, तो कोणाचा तरी विचार करत आहे."
             सर्वजण त्याला काय पाहिजे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. ते त्याचे आवडते पदार्थ बनवतात, परंतु त्याच्या परिस्थितीत काहीही बदल होत नाही. मग नातेवाईक त्याच्या लाडक्या व्यक्तीला तार पाठवतात. त्यांना वाटते की कदाचित त्याच्यात जीव गुंतला असेल. ती व्यक्ती येते आणि थोडे तुळशीचे पाणी किंवा चमचाभर दूध त्याच्या तोंडात घालते, त्याबरोबर त्याचा जीव ते शरीर सोडून जातो आणि त्याचा मृत्यु होतो. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा