ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रज्ञान म्हणजे अंतर्ज्ञान. हे परमज्ञान आपल्या प्रत्येकामध्ये आहे. "
७
प्रेम निरपेक्ष असते
' दुसरे काहीही नको ' ही माझी अवस्था नवनिर्मिती झाली. या माझ्या जगात मी आणि स्वामी फक्त दोघेच आहोत.
या अवतारावरील माझ्या प्रेमापोटी मी ईश्वरावस्थासुद्धा नाकारली.
काहीजण असे आहेत ज्यांना फक्त परमेश्वराचीच आंस आहे, पण तरीही त्यांच्यात एखाद् दोन इच्छा रेंगाळत आहेत. माणसं 'मला पाहिजे' अस का म्हणतात ? पाहिजे याचाच अर्थ 'इच्छा'. ' काही हवे असणे ' इच्छा उत्पन्न करते. इच्छांच मन होत. 'मी' हा इच्छेतूनच डोक वर काढतो. म्हणूनच आपण म्हणतो, 'मला पाहिजे' , आणि ह्या एका विचारातूनच विचारांची शृंखला निर्माण होते. 'मी' हे त्याच मूळ आहे. तो 'मी' जोपर्यंत आहे तोपर्यंत इच्छा राहतीलच. आपल्याला वाटेल आपण सगळ्याचा त्या केला, पण अगदी नकळतपणे इच्छेचा सूक्ष्म अंश आपल्यात शिल्लक राहिलेला असतो. ही सुप्त इच्छा अंतकाळी उफाळून वर येते आणि आपल्याला जन्ममृत्युच्या चक्रात ढकलते. मी 'लास्ट अॅटम ' या प्रकरणात याविषयी लिहिले आहे.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा