गुरुवार, १४ एप्रिल, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" व्यक्तिगत आवडनिवडीने अंतर्ज्ञानाला झाकोळले आहे. " 
प्रेम निरपेक्ष असते 

           आता याच बारकाईने विचार करूया. ती व्यक्ती जवळजवळ मृतच झालेली असते. अगदी बारीकसा श्वास घशात अडकलेला असतो. कोणाला तरी भेटण्याची क्षुल्लक इच्छा, अणूइतके सूक्ष्म ममत्व त्याच्या श्वासात वहात असतो. त्या लाडक्या व्यक्तीने येऊन दूध पाजल्याबरोबर इच्छा पूर्ण होऊन त्याचा प्राण जातो.
           मृत्युशय्येवर असताना अवयव काम करेनासे होतात, पंचेंद्रियांची जाणीव क्षीण झालेली असते ... मग तरीही अणूइतकी सूक्ष्म इच्छा कशी काय प्रिय व्यक्तीला ओळखते ? हा मानवावरील गहिऱ्या ठशांचा आश्चर्यकारक प्रभाव आहे. अशाप्रकारे अणूसमान असलेली सूक्ष्म इच्छा पुनर्जन्माच बीज होते. प्राण जाण्याची वेळ येऊन ठेपलेली असतानासुद्धा मनातील इच्छेची ताकद केवढी प्रचंड असते! इच्छा त्या व्यक्तीला धरून ठेवते, त्याला हे जग सोडून देता येत नाही. असा हजारो इच्छांमुळे माणूस पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा