ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" एखाद्याच्या जन्मापासून मृत्युपर्यंत उमटलेले भावच मनावर उमटलेले दीर्घ ठसे बनतात."
८
प्रेम निरपेक्ष असते
मी नेहमी म्हणत असते, ' मला स्वामी हवेत, मला स्वामी हवेत' . स्वामी म्हणाले, हा माझा श्वास आहे आणि ' मला दुसर काही नको' हा माझा उच्छ् वास आहे. हे भाव अवकाश व्यापताहेत. ' मला स्वामी हवेत ', हा ध्यास श्वासाप्रमाणे माझ्यात वाहतो. स्वामी माझ्या शरीरातील प्राणवायू आहेत. ह्या प्राणवायूमुळे माझ शरीर कार्यरत राहत आणि हा ध्यास अवकाश व्यापून टाकतो. म्हणूनच सत्ययुगात परमेश्वराची तृष्णा हाच सर्वांचा श्वास असेल. मी फक्त परमेश्वराची इच्छा धरून इतर सर्व दूर सारतो. हाच माझा उच्छवास आहे.
' मला दुसरं काही नको ' हा भाव माझ्या शरीरातील कार्बन-डाय-ऑक्साईड वायू आहे. जगण्यासाठी श्वासावाटे प्राणवायू आत घेतला जातो आणि उच्छ् वासावाटे, कार्बन-डाय-ऑक्साईडबाहेर टाकला जातो. त्याच प्रमाणे जर माणसाला परमेश्वरप्राप्ती हवी असेल, तर त्याने इतर सर्व दूर सारून फक्त परमेश्वराची इच्छा बाळगली पाहिजे. बाकी सर्व हे या प्राप्तीच्या मार्गावरील अडथळे आहेत. भौतिक बंधनेच नव्हे तर आध्यात्मिक इच्छाही नाकारायला हव्यात.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात.....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा