ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जन्म हे सर्व वेदना आणि दुःखाचे मूळ कारण आहे ."
७
प्रेम निरपेक्ष असते
परीक्षित राजाला ठाऊक होते की तो सात दिवसात मृत्यु पावेल. म्हणूनच त्याने राजकर्तव्यांचा त्याग केला आणि एका निर्जनस्थळी जाऊन राहिला. तिथे तो २४ तास अखंडपणे प्रभूचा महिमा ऐकत राहिला. अनेक ऋषी त्याच्या सभोवती गोळा झाले. परीक्षित पूर्णपणे तंदुरुस्त होता, त्याची इंद्रिये व्यवस्थित कार्य करीत होता. त्याच मन पूर्णतः परमेश्वरावर केंद्रित असल्यामुळे तो भगवंताशी पूर्णपणे एकरूप झाला. जे लोक मनाच्या आधीन असतात, त्यांना त्यांच्या मृत्युची घटका माहीत नसते. त्यांची इंद्रिये गलितगात्र होतात. डोळे अधू होतात. साक्षात् परमेश्वर जरी समोर येऊन उभा राहिला, तरी त्यांना दिसणार नाही ! एक अणूएवढी सूक्ष्म इच्छा मनात घर करून राहिलेली असते. ही इच्छा तुमचे प्राण शरीरात ठेवते. अखेरची अणूसदृश इच्छा, मोह आणि ममत्व इतके सामर्थ्यवान आहेत.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा