ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण केवळ परमेश्वराचे आहोत अन्य कोणाचेही नाही. "
७
प्रेम निरपेक्ष असते
स्वामी म्हणालेत की आमचे अखेरचे दिवस परीक्षितप्रमाणेच ठरलेले आहेत. आश्रमवासी आणि मी स्वामींबरोबर राहू. त्यावेळी आम्हाला त्यांचे दर्शन, स्पर्श आणि संभाषण लाभेल. आम्ही याच जाणीवेत स्वामींमध्ये विलीन होऊन हे जग सोडू. आमच्या अखेरच्या क्षणांचा हा अनुभव आमचे परमेश्वरासोबतच्या पुढील जन्माचे संस्कार होतील. आम्ही परीक्षितापेक्षाही भाग्यवान आहोत. कारण आम्ही परमेश्वरासोबत राहणार, त्याच्यासोबत ही धरती सोडून जाणार आणि पुन्हा परमेश्वरासोबत येणार आणि त्याच्या सहवासात राहणार. हीच आहे पूर्णावस्था. इथे स्थूल, सूक्ष्म आणि कारण ही तीन शरीरे एकत्व पावणार. इथे जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि तुर्यावस्था ह्या तिन्ही अवस्था एक होणार. सर्वजण ही पूर्णावस्था प्राप्त करू शकणार.
आपल्या मनाला बाह्यजगापासून आत वळवून परमेश्वराचा ध्यास घेण्यासाठी स्वामींनी आपल्याला २८ वर्षे दिली आहेत.
* * *
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा