ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" निर्मितीतील सूक्ष्मात सूक्ष्म जीवापासूनही शिकण्याची विनयशीलता ज्यांच्यामध्ये असते त्यांनाच ईश्वरप्राप्ती होते. "
७
प्रेम निरपेक्ष असते
एका व्यक्तीला इस्पितळात दाखल केले जाते. डॉक्टर नातेवाईकांना सांगतात, " तो फार तर ४ दिवस जगेल. सर्वांना कळवा." ही व्यक्ती शुद्धीवर आहे. त्याची इंद्रिये व्यवस्थित काम करताहेत. त्याला मृत्युपूर्वी त्याचे आवडीचे पदार्थ खायचे आहेत. तो त्याच्या बायको, मुलांना लांबलचक यादी देतो. ते एकमेकांना, " हे अमुक हॉटेलातून आणा, ते तमुक हॉटेलातून आणा " अशा सूचना देतात. अशारितीने ते मारणाऱ्या व्यक्तीविषयी त्यांचे प्रेम व काळजी व्यक्त करतात. ती व्यक्ती वकिलाला बोलावते आणि मृत्युपत्राविषयी चर्चा करते. यावेळीसुद्धा त्याच्या मनात परमेश्वराचे विचार येत नाहीत.
पहिल्या घटनेत, ती व्यक्ती बेशुद्धावस्थेत मरते. इथे ही व्यक्ती पूर्ण शुद्धीत असताना मरते ; फरक काय ? दोघेही सारखेच. दोघांचेही प्राण परमेश्वराच्या विचारात जात नाहीत. याचे कारण त्यांच्या मनांची मलीनता. या जगात परीक्षितसारखे किती आहेत ? किती लोक खंबीरपणे मृत्युचा सामना करायला तयार आहेत? परीक्षितप्रमाणे माणसाने आपले अखेरचे दिवस परमेश्वराच्या विचारात, सत्संगात व्यतीत करायला हवेत.
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा