ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
९
वैश्विक कृतज्ञता
मी " मी नाही, फक्त स्वामीच सगळं करतात.", असे म्हणते. त्यामुळे माझ्यात मी राहातच नाही, फक्त स्वामीच भरून राहिलेत. मी स्वामींच्या विचारात सतत रडत असते. माझे शरीर फक्त स्वामींनी भरले आहे, ते सर्वज्ञ आहेत.
परमेश्वर साक्षी अवस्थेत असतो. त्याचे सर्वज्ञत्व आणि सर्वशक्तिमानत्व त्यानुसार कार्य करते. मी ती अवस्था प्राप्त केली, पण मला 'मी' नसल्याकारणाने, माझे कृतज्ञतेचे भाव सर्वव्यापक होतात आणि मानवजातीला मदत करतात.
'सत्ययुग आणि कर्मकायदा' या पुस्तकात मी म्हटलंय की तुमची कर्म तुमच्या खात्यात ठेवली जातील. सत्ययुग संपल्यावर सर्व आत्मे पुन्हा त्यांची कर्म घेऊन जन्म घेतील. तरीसुद्धा ही कर्म अर्ध्यांनी कमी होतील. कशी? माझ्या तपशक्तीने. जर असं नाही घडलं, तर सत्ययुगातील माणसे स्वामींचे दिव्य भाव वाहणारी पात्रे होऊ शकणार नाहीत.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम