मंगळवार, ९ एप्रिल, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
           श्री वसंतसाईंनी ही ज्ञानसंपदा अध्यात्मिक अध्ययनातून अर्जित केली नसून प्रत्यक्ष अनुभवातून मिळवली आहे. वैदिक मंत्रामधील सूक्ष्मभेद जाणून घेऊन नव्हे तर अढळ श्रद्धेतून, कर्मकांड व विधींद्वारे नव्हे तर विशुद्ध प्रेम आणि समर्पण, शिस्त आणि विवेक ह्यांच्याद्वारे मिळवली आहे. श्री सत्य साईंना प्राप्त करण्याच्या त्यांच्या निर्धाराने त्यांना वैदिक मार्गावर वाटचाल करण्यास प्रेरित केले. जो मार्ग केवळ त्यांच्या निस्वार्थ प्रेमाच्या प्रकाशाने प्रकाशमान झाला होता. त्यांनी हा मार्ग आध्यात्मिक विद्वान पंडितांसाठी तसेच सामान्य साधकांसाठी,. सर्वांसाठी सुलभ केला. तथापि त्यामागे वेदांची महती सांगण्याचा त्यांचा उद्देश्य नव्हता हे पुस्तक लिहिताना सदैव भगवानांची आज्ञा पाळणे हे एकच सूत्र त्यांनी पाळले चला तर मग आपण त्यांच्या मनःपूर्वक सांगितलेल्या सत्याच्या अनुभवांमध्ये सहभागी होऊ या.

जय साईराम ॐ  श्री वसंतसाईसाय नमः

मुक्ती प्रिया
मुक्ती निलयम



उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा