ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
९
वैश्विक कृतज्ञता
३० जानेवारी २००९ चे ध्यान
वसंता- स्वामी, अनेक संत, महात्मे होऊन गेलेत. काही दर्शन, काहीच स्पर्शन, तर काही मंत्र मंत्रदीक्षेद्वारा आशिर्वाद देतात. असं का बरं?
स्वामी- प्रत्येकाची आपली वेगळी पद्धत असते. मी साखळ्या, अंगठ्या, विभूती इ. प्रकट करतो. तू हे सर्व करू शकत नाहीस. कारण तुझ्यात 'मी' नाही. तुझी तपशक्ती बाहेर जाते आणि अवकाश व्यापते. इतर जे करतात किंवा मी जे करतो ते कर्म कायद्याला अनुसरून असते. ज्यांच्या तुझ्यावर पूर्ण विश्वास व आढळ श्रद्धा आहे त्यांच्याकडेच तुझी सर्वव्यापक शक्ती पोहोचते. हीच शक्ती मुक्ती प्रदान करते. ती कर्मसंहार करते. हे सर्व फक्त तुझ्या कृतज्ञतेच्या भावांमुळे होते. तुझ्या कृतज्ञतेपोटी तुला सर्वांना मुक्ती द्यायची आहे.
वसंता- स्वामी काहींची माझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे, तरीही ते मायेपासून मुक्त नाहीत, असे का?
स्वामी- त्यांना सर्वस्वाचा त्याग करायचा आहे, पण काही बंधने आहेतच.
ध्यानाची समाप्ती.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा