गुरुवार, १८ एप्रिल, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

         " परमेश्वरावर केंद्रित असणारे भक्ताचे प्रेम विस्तार पावते आणि जीवात्मा परमात्मा बनतो. प्रेम ईश्वर आहे. ईश्वर प्रेम आहे."


    
   वैश्विक कृतज्ञता
   

       

            ही मी नाही. मला 'मी' असेल तरच मी माझ्या इच्छेने कृती करू शकेन.  मला 'मी' नसल्यामुळे माझ्याकडे शक्ती आहेत की नाहीत याची मला जाणीव नाही. मला फक्त एकच गोष्ट माहित आहे आणि ती म्हणजे स्वामी, फक्त स्वामी. बाकी मला काही माहीत नाही. मी अगदी तुम्हाला आश्वासन देते, मला खरंच काही माहित नाही. ते मला लिहायला सांगतात. मी काहीतरी लिहिते. मी कुणीही नाही. अगदी कुणीसुद्धा नाही, फक्त त्यांच्या चरणांची धूळ आहे. मी हे सर्व लिहितेय, पण पुढे लिहूच शकत नाही. मी सतत रडते आहे, माझे अश्रू थांबतच नाहीत, माझे भाव आवरूच शकत नाही. मी हे सर्व का बरे लिहीले ? याचा काय उपयोग? यामुळे मला माझे स्वामी मिळणार आहेत का? मी पुढे लिहूच शकत नाही.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा