ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुमच्या चांगल्या वाईट दोन्ही कर्मांची कार्मिक खात्यात नोंद केली जाते."
९
वैश्विक कृतज्ञता
१ फेब्रुवारी २००९ ध्यान
वसंता- स्वामी, तुम्ही काय म्हणालात, मला काही समजले नाही. माझ्या कृतज्ञतेनी जगाला कसा काय फायदा होणार?
स्वामी- तू नेहमी म्हणतेस, "मी नाही, मी नाही ". यत् भावम् तत् भवति. तू 'मी' होतेस. परमेश्वर सर्वव्यापी, सर्वज्ञ आहे; तरीसुद्धा तो फक्त साक्षी अवस्थेत आहे. त्याचप्रमाणे, तुझी ऊर्जा आणि शक्ती या सर्वव्यापी, सर्वज्ञ आहेत; पण त्या काही साक्षी अवस्थेत नाहीत. लोकांची जी गरज आहे, ती त्या पूर्ण करतात. हे तुझ्या कृतज्ञतेच्या भावांमुळे होते. ही वैश्विक ऊर्जा अशातऱ्हेने कार्य करते.
वसंता- जर यामुळे कर्म पुसली जात असतील, तर मग आपण कर्म कायद्याविषयी कशाला लिहिले?
स्वामी- कर्म समतोल करण्यासाठी कर्मकायदा काम करतो. प्रत्येकानी कर्मामुळे हजारो जन्म घेतलेत, जर हे असेच चालू राहिले, तर मग ते परमेश्वराचे भाव धारण करणारी पात्र कशी होणार?
ध्यानाची समाप्ती.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा