रविवार, १४ एप्रिल, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

         " मेणबत्ती जशी प्रकाश देण्यासाठी स्वतः जळते, तसे तुम्ही जगातील सर्वांना प्रेम द्या. "


    
   वैश्विक कृतज्ञता
   

       

             ही विश्वशक्ती म्हणजेच माझे कृतज्ञतेचे भाव, मी या जगात प्रत्येकाकडून प्रत्येक गोष्टीतून शिकत आले, म्हणून मला कृतज्ञता व्यक्त कराविशी वाटते. मी विश्वमुक्ती मागते आहे. अशाप्रकारे मी सर्वांप्रती माझे कृतज्ञतेचे भाव व्यक्त करत आहे.
            माझी तपशक्ती सर्वव्याप्त होते. ज्यांची माझ्यावर पूर्ण श्रद्धा आहे त्यांच्यापर्यंत ही शक्ती पोहोचते आणि त्यांना मदत करते. मी लोकांसाठी प्रत्यक्ष काही करू शकत नाही. जर मी केले तर माझी शक्ती बाहेर प्रकट होईल. मला स्वतःला माझी शक्ती प्रकट करायची नाही. जर मी हे केले तर माझ्या सभोवती गर्दी होईल. मला गर्दी नको, मला नाव, प्रसिद्धीसुद्धा नको. मी फक्त एक साधन आहे, स्वामींचं साधन. त्यांना जे हवे ते मी करते. मला ह्या सर्व शक्ती नकोत, म्हणूनच मी त्या दूर लोटते. त्यामुळे त्या अवकाश व्यापतात. माझी एकमेव इच्छा म्हणजे विश्वमुक्ती आणि स्वामींची प्राप्ती. माझ्यातून प्रकट होणाऱ्या शक्ती या विश्वमुक्तीसाठी आहेत. इथे मला काही करायची आवश्यकता नाही. सर्व काही आपोआप घडून येते.    

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा