ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
८
सहस्रार
श्रीराम जरी एक मानव म्हणून, साधा राजकुमार म्हणून जगले, तरी त्यांच्यात दिव्य गुण होतेच. ते करुणा, त्याग आणि सर्वांवर समान प्रेम करणे हे गुण दर्शविण्यासाठी जगले. परमेश्वर, राम या नावाने एका मानवाची जीवन जगले.
श्रीकृष्णांनी ते स्वतः परमेश्वर आहेत हे उघडपणे दाखवले. गीतेद्वारे त्यांनी मनुष्याने जीवन कसे जगावे हे शिकवले. माणसाच्या मनात विचारांचे वादळ कसे उठते हे महाभारत युद्धातून दाखवले. हे माणसाच्या चांगल्या आणि वाईट स्वभावामधील युद्ध आहे. माणसाने आयुष्य कसे जगावे हे श्रीकृष्ण, गीतेद्वारे सांगतात. तरीसुद्धा, कोणीही श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे वागत नाही.
कलियुग कळसाला पोहोचले असताना भगवान श्री सत्यसाईबाबा अवतार म्हणून अवतरले आहेत. स्वामीसुद्धा हीच शिकवण देत आहेत की माणसाने स्वतःला बदलण्याची गरज आहे. तरीसुद्धा कोणी स्वतःला बदलायला तयार नाही. म्हणूनच ते माझ्या द्वारे आणि माझ्या तपश्चर्येद्वारे दाखवताहेत की मानवात जगाला बदलायची आणि युग बदलायची शक्ती आहे. पूर्वी मी एक काव्य रचली होते:
माझ्या सहस्त्र दळी हृदयकमल सिंहासनी आरुढ व्हा.
गाऊनी आर्जवे करिते सहस्त्र काव्यांनी, याल का हो पर्तीशा ?
जेव्हा मी हे काव्य लिहिले तेव्हा मला सहस्त्र पाकळ्यांची कमळ सहस्त्रार किंवा कुंडलिनी याविषयी काहीच ठाऊक नव्हते. मला फक्त एकच गोष्ट माहित होती; माझ्या हृदयात फक्त स्वामींसाठीच जागा आहे.
* * *
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा