गुरुवार, ३० मे, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

          " देहभावाचा त्याग केल्यानंतर सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो. "


    
   वैश्विक कृतज्ञता
          

              कर्मकायद्याच्या घडलेल्या घटना 

           मी भावावेग सहन करू शकले नाही आणि रडू लागले. नेहा माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडल्या. त्या  म्हणाल्या, "अम्मा ,मी  ध्यान करीत होते तेव्हा मला संपूर्ण शरीरभर कंपने जाणवत होती. ती गोलगोल फिरत माझं संपूर्ण शरीर व्यापत होती." ही घटना २४ मार्च २००८ ला झाली. नेहा कडून नोव्हेंबर मध्ये ई-मेल आला.


अम्मा,
               तुम्ही मला काही दिवस औषध चालू ठेव म्हणून सांगितलेत. मी तसे केले.  एसव्ही म्हणाले, " एक दिवस तुझा अंतर्मनाचा आवाज तुला औषध थांबवण्यास सांगेल." मी २५ ऑक्टोबर २०१८ पर्यंत औषध घेत राहिले. २६ ऑक्टोबर ला आम्ही पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट अशा तीर्थयात्रेस निघालो व नंतर मुंबईला गेलो. त्याच दिवसापासून मी औषध घेणे बंद केले.
             १ नोव्हेंबर २००८ आम्ही मुंबईहून परत आलो. मी प्रार्थना केली," बाबा प्लीज मला औषधांपासून मुक्त करा." त्यांची अनुमती मिळवण्यासाठी मी बाबांच्या पादुकांवर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अनुमती दिली मला अतिशय आनंद झाला.
             २४ मार्च 
२००८ या गुरुकृपादिनापासून मी 'झाईमुरीन' गोळ्यांसोबत वसंतसाई विभूती घेत होते. आता मी 'झाईमुरीन' ऐवजी 'साईमुरीन' घेते. मला बरे वाटते आहे. मला औषधांपासून मुक्त केल्याबद्दल आम्हा बाबा तुम्हाला धन्यवाद.

फक्त तुमची,

नेहा.

   *     *     *

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




रविवार, २६ मे, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

" परमेश्वर सत्यस्वरूप आहे. "


    
   वैश्विक कृतज्ञता
          

              कर्मकायद्याच्या घडलेल्या घटना 

            नेहा नावाच्या एका भक्ताला मायस्थेनियाग्रेव्हीस नावाचा रोग झाला होता. डॉक्टरांनी त्यांना ऑपेरेशन करायला पाहिजे असा सल्ला दिला होता, पण त्यांच्या मनाची तयारी नव्हती. एसव्हींनी मला त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सांगितले. मी त्यांच्या शरीराला विभूती लावली आणि ' ॐ श्री साईराम ' चा जप केला. मी त्यांना बरे करण्यासाठी स्वामींजवळ प्रार्थना केली. मी अगदी हृदयाच्या गाभ्यातून जप केला. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आम्ही ध्यानास सुरुवात केली. मला दिव्य दृश्य दिसले.
दृश्य
             स्वामी एका कलशातून नेहाच्या डोक्यावर अमृताचा वर्षाव करीत आहेत; तिच्या संपूर्ण शरीरावरुन अमृत वाहतंय.
वसंता - स्वामी, प्लीज नेहाला आशीर्वाद द्या म्हणजे ती पूर्णपणे बरी होईल. 

स्वामी - तुझे हात, अमृताचे हात आहेत. ती नक्कीच बरी होईल.  
वसंता - तुम्ही अमृताचा वर्षाव करीत आहात, पण म्हणताय की मी करते आहे ?
स्वामी - तू नेहमी माझाच विचार करतेस, मला बोलवतेस, म्हणून तुझी शक्ती माझे रूप धारण करते आणि सर्व काही करते.
वसंता - प्लीज, नेहा पूर्णपणे रोगमुक्त होऊ देत.
स्वामी - ती नक्कीच होईल.
वसंता - या जगात कोणालाच त्रास होऊ नये. मी फक्त त्यासाठीच आले आहे.
ध्यानाची समाप्ती.     

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



गुरुवार, २३ मे, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
             या अनुभवाने मी थक्क झाले, झपाटली गेले, आणि अस्वस्थतेने घराभोवती फेऱ्या घालू लागले. मी थोडासा आईस्क्रीम खाल्लं मी माझ्या नातीशी वैष्णवीशी बोलत होते व जे मी पाहिले ते मनावेगळे करण्याचा प्रयत्न करत होते परंतु फिरून फिरून तेच (दुर्गेचे) विचार माझ्या मनात पिंगा घालत होते. मी धावतच पुन्हा देवघरात गेले व अत्यंत खोल आवाजात स्वामींना हाक मारत होते " स्वामी... स्वामी...."
स्वामी : आता पुन्हा दुर्गा?
वसंता : स्वामी, मला दुर्गेच्या सर्व शक्ती प्रदान करा. मला दुर्गा बनलीच पाहिजे मला विश्वातील समस्यांचे आणि कर्मांचे निराकरण केलेच पाहिजे. मला दुर्गा बनवा स्वामी..... जागत्या दुर्गे मध्ये परिवर्तन करा. लोक समस्या निवारणासाठी मंदिरामध्ये जाऊन दुर्गेला आळवतात. तिने त्यांना त्यांच्या समस्यांमधून मुक्त करायला नको का?
स्वामी : रडू नकोस. तू दुर्गा आहेस. सर्व शक्ती तुझ्या मध्ये विद्यमान आहेत. तू सर्व समस्या सोडवणार आहेस.
वसंता : माझ्याकडे येणाऱ्या सर्व दीनदुखी त्यांना मी मदत केलीच पाहिजे. सत्यालाही( एक भक्त) मदत केलीच पाहिजे स्वामी.
            त्या रात्री मी झोपलीच नाही. वेड्यासारखा ती दुर्गेची पाषाणाची मूर्ती मांडीवर घेऊन " माते! माते!" म्हणत मी आक्रोश करत होते. मी माझ्या अश्रूंनी तिला अभिषेक केला." मी आता लोकांच्या समस्यांचे आणि कर्मांचे निराकरण करायला नको का? अन्यथा हा जन्म घेण्याचा उपयोग काय? हा देहा कशासाठी आहे ?अशा विचारांनी माझे मन विषण्ण झाले होते. हा करुणामय परमेश्वर आपल्या सोबत असताना जगाला मुक्ती मिळायलाच हवी. आता नाही तर मग कधी? मन विचलित झाल्याने मी रात्रभर रडत होते.




उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

         " देहभावाचा त्याग केल्यानंतर सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो."


    
   वैश्विक कृतज्ञता
          

              कर्मकायद्याच्या घडलेल्या घटना 

             ' प्रेम निवारण साई ' पुस्तकात मी लिहिले आहेच की माझ्या प्रार्थनेने कित्येक लोक रोगमुक्त झाले आहेत. या पुस्तकाच्या प्रती संपल्या आहेत, पण आता आम्ही त्या पुन्हा छापत आहोत. मी त्यात अजून काही लोकांचे अनुभव नमूद करावेत अशी मला विनंती केली गेली पण मी नाही म्हटले. मी अजून किती पुस्तके लिहू? आता मी व्यक्तिशः शक्ती देत नाही. स्वामी म्हणाली की कुठल्याही कानाकोपऱ्यातून जर श्रद्धा आणि भक्तीने माझी प्रार्थना केली तर माझे कृतज्ञतेचे भाव त्यांची मदत करेल.

*      *     *

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम