गुरुवार, १६ मे, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

           " विनयशीलता, निरहंकारी मन आणि अढळ श्रद्धा या गुणांसहित मार्गक्रमण करणाऱ्यास निश्चित यशप्राप्ती होते."


    
   वैश्विक कृतज्ञता
          

              कर्मकायद्याच्या घडलेल्या घटना 

 
              मी मुंबईला हरीश च्या घरी तीन वेळा गेले. प्रत्येक वेळी कुटुंबातील कोणीतरी आजारी तरी होते नाहीतर काही अडचणी तरी होत्या. मी प्रथम गेले तेव्हा हरीश खूप आजारी होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते आणि ड्रीप लावले होते. त्यांचे वडील आणि बहीण रीटा आम्हाला गाडीने त्यांच्या घरी घेऊन गेले. मला वाटले की हरीश आजारी आहे, तर त्यांची धावपळ होईल, पण तरी ते आग्रहानी मला घरी घेऊन गेले. त्यांच्या घरी पोहोचलो, तेव्हा हरीश स्वतः माझं स्वागत करायला हजर होते. माझं स्वागत करण्यासाठी त्यांनी स्वतःला हॉस्पिटल मधून मुक्त करून घेतले होते. तरीपण हातात सुई लावलेली होती.
             त्यांच्या घरी दुसऱ्यांदा गेले तेव्हा त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती. यावेळी मुंबईला गेले तेव्हा त्यांचे मेहुणे, जीत हे यकृतातील कळा असह्य झाल्याने बोलूही शकत नव्हते. मी त्यांना विभूती दिली, नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हरीश ११ वाजता परत आले १२ वाजता ते आम्हाला मदुरैला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर घेऊन गेले. अचानकपणे तिथे एक वाजता जीत आम्हाला निरोप द्यायला स्टेशनवर आले. त्यांना एकदम बरं वाटत होतं. त्यांना इतक्या लवकर हॉस्पिटल मधून कसं सोडलं याचा आम्हा सर्वांना आश्चर्यच वाटलं.
            हरीश च्या कुटुंबाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जर कोणाची तब्येत बिघडली तर ती नेहमी विभूती लावतात आणि मंत्राचा जप करतात. त्यांची श्रद्धा आणि भक्तीच त्यांना बरं करते. स्वामी म्हणतात," प्रत्येक वेळी तू त्यांच्या घरी जातेस तेव्हा मोठी दुर्घटना टाळते." हा आहे उपाय - श्रद्धेने कर्म नाहीशी होतात.

*    *    *


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा