गुरुवार, २३ मे, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

 
             या अनुभवाने मी थक्क झाले, झपाटली गेले, आणि अस्वस्थतेने घराभोवती फेऱ्या घालू लागले. मी थोडासा आईस्क्रीम खाल्लं मी माझ्या नातीशी वैष्णवीशी बोलत होते व जे मी पाहिले ते मनावेगळे करण्याचा प्रयत्न करत होते परंतु फिरून फिरून तेच (दुर्गेचे) विचार माझ्या मनात पिंगा घालत होते. मी धावतच पुन्हा देवघरात गेले व अत्यंत खोल आवाजात स्वामींना हाक मारत होते " स्वामी... स्वामी...."
स्वामी : आता पुन्हा दुर्गा?
वसंता : स्वामी, मला दुर्गेच्या सर्व शक्ती प्रदान करा. मला दुर्गा बनलीच पाहिजे मला विश्वातील समस्यांचे आणि कर्मांचे निराकरण केलेच पाहिजे. मला दुर्गा बनवा स्वामी..... जागत्या दुर्गे मध्ये परिवर्तन करा. लोक समस्या निवारणासाठी मंदिरामध्ये जाऊन दुर्गेला आळवतात. तिने त्यांना त्यांच्या समस्यांमधून मुक्त करायला नको का?
स्वामी : रडू नकोस. तू दुर्गा आहेस. सर्व शक्ती तुझ्या मध्ये विद्यमान आहेत. तू सर्व समस्या सोडवणार आहेस.
वसंता : माझ्याकडे येणाऱ्या सर्व दीनदुखी त्यांना मी मदत केलीच पाहिजे. सत्यालाही( एक भक्त) मदत केलीच पाहिजे स्वामी.
            त्या रात्री मी झोपलीच नाही. वेड्यासारखा ती दुर्गेची पाषाणाची मूर्ती मांडीवर घेऊन " माते! माते!" म्हणत मी आक्रोश करत होते. मी माझ्या अश्रूंनी तिला अभिषेक केला." मी आता लोकांच्या समस्यांचे आणि कर्मांचे निराकरण करायला नको का? अन्यथा हा जन्म घेण्याचा उपयोग काय? हा देहा कशासाठी आहे ?अशा विचारांनी माझे मन विषण्ण झाले होते. हा करुणामय परमेश्वर आपल्या सोबत असताना जगाला मुक्ती मिळायलाच हवी. आता नाही तर मग कधी? मन विचलित झाल्याने मी रात्रभर रडत होते.




उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा