ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
९
वैश्विक कृतज्ञता
कर्मकायद्याच्या घडलेल्या घटना
विजयालक्ष्मींचे पती श्री. कलानिधी म्हणाले, "अपघात होत असताना आम्हा सर्वांना अगदी स्पष्टपणे संदेश मिळत होता. दोन वाक्ये आमच्या चांगली लक्षात राहिली, ' निश्चिंत राहा, तुम्ही सुरक्षित आहात. ही घटना अटळ होती. 'मी ड्रायव्हरची खिडकी फोडून बाहेर पडलो आणि सर्वांना बाहेर काढले. मला कळले की घटना अटळ होती, असा संदेश का आला. गाडीचे नुकसान बरेच झाले होते, पण कोणालाही फारशी दुखापत झाली नाही !"
विजयालक्ष्मी म्हणाल्या , " मी बहुधा प्रवासात जप करत असते. परंतु त्या दिवशी माझी बहीण प्रवासात सतत माझ्याशी बोलत होती. आम्ही केवळ अम्मा, बाबांमुळेच वाचलो."
* * *
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा