रविवार, ५ मे, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार 

         " आपले जीवन एक स्वप्न आहे. जेव्हा आपण त्या स्वप्नातून जागे होऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की ही सर्व प्रभूची दिव्य लीला आहे."


    
   वैश्विक कृतज्ञता
          

              कर्मकायद्याच्या घडलेल्या घटना 

 
                 विजयालक्ष्मी पॅरीसमध्ये असताना त्यांनी माझे ' लिबरेशन हिअर इटसेल्फ राईट नाऊ - भाग १' हे पुस्तक वाचले. त्या मला फोन करत असत. काही वर्षांनी त्यांचं कुटुंब भारतात परतले आणि मदुरैला स्थायिक झाले. ते एकदा माझ्या घरी वडक्कमपट्टीला आले, तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मला प्रार्थना करण्यास विनंती केली. स्वामींनी लग्नाला आशीर्वाद दिले. मी त्याविषयी ' वडक्कमपट्टीत लग्न ठरले ' या प्रकरणात सविस्तर लिहीले आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची माझ्यावर श्रद्धा आहे. त्यांच्या घरात जेव्हा पूजेचे विधी असतात तेव्हा विजयालक्ष्मी मला आवर्जून बोलावतात आणि स्वामींचे आशीर्वाद मागतात. वर्षभरापूर्वी एकदा त्यांचे कुटुंबीय चेन्नईला जीपने जात होते. मध्यरात्रीची वेळ होती. मुसळधार पाऊस पडत होता. एकाएकी जीप रस्ता सोडून बाजूला गेली आणि तीन वेळा कोलांड्या खात तीस फूट खोल दरीत जाऊन पडली. सर्वजण जीपमध्ये अडकून पडले. ते मदतीसाठी ओरडत होते. त्यानंतर जवळजवळ एक तासानी दुसरी गाडी आली आणि त्यांनी दोरखंडानी जीप कशीतरी वर उचलली. ॲम्बुलन्स बोलवून सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेले. कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, फक्त त्यांच्या वृद्ध आईला थोडेफार खरचटले. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा