ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
९
वैश्विक कृतज्ञता
कर्मकायद्याच्या घडलेल्या घटना
जयप्रकाशचे कुटुंब मला २००० सालापासून ओळखतंय. मी दिल्लीला गेले की ते मला त्यांच्या घरी बोलवत असत. मुक्ति निलयमच्या उद्घाटनानंतर त्यांचे कुटुंब दिल्लीहून मदुरैला आले. जयप्रकाश सेनादलात मोठ्या हुद्यावर काम करत होते. त्यांना आश्रमात सेवा करायची इच्छा होती म्हणून त्यांनी नोकरी सोडून दिली. कुटुंबातील इतर सदस्यही चांगल्या हुद्द्यावर होते. पण त्यांनाही मदुरैला येण्यासाठी त्याचा त्याग केला. आता त्यांनी आश्रमाजवळ घर बांधण्यासाठी जमीन घेतली आहे. जयप्रकाश आश्रमात राहतात आणि आठवड्यातून दोन दिवस घरी जातात.
१० नोव्हेंबर २००८ ला आम्ही. कॉजल वर्ल्ड. (कारण जग) या इमारतीचं उद्घाटन करणार होतो. जयप्रकाशच्या कुटुंबियांनी त्यासाठी प्रसाद बनवला. तो घेऊन ते आश्रमात येत असताना त्यांच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला. गाडी कोलांट्या खाऊन रस्त्याच्या कडेला गेली. एस. व्ही. आले आणि त्यांनी त्या सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे त्यांना प्राथमिक उपचार केले गेले. नंतर सर्वजण कार्यक्रमासाठी आश्रमात आले. त्यांनी प्रसादही बरोबर आणला होता. सर्वांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या. त्यांना पट्ट्या बांधल्या. ते म्हणाले की प्रसादाची भांडी गाडीतून बाहेर फेकली गेली होती, तरीपण फार काही वाया गेले नाही. मी म्हणाले की त्यांच्या दृढ भक्तीनेच त्यांचे रक्षण केले.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा