गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

         " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय. "

१२

  सहस्त्र मातांचे प्रेम

            सकाळी मी गोंधळलेल्या अवस्थेत होते. मला रडू आले. मी हे कसं बरं करणार ? मी कोणाबरोबर बरं पत्र पाठवावं ? काय करावं मला काही सुचतच नव्हतं. मी एडी किंवा यामिनीलाही सांगितले नाही. मला खूपच भीती वाटत होती. आज रविवार आहे. त्यामुळे बरीच लोकं मला भेटायला आहे. माझं मन सतत विचार करतंय, " हे सर्व कसं काय होणार ?"

दुपारचे ध्यान
वसंता - स्वामी, मी हे पुस्तक नाही पाठवणार. आत्मचरित्र पूर्ण झाले की  मग मी ते पाठवीन. हे पुस्तक नाही.
स्वामी - तुझा माझ्या शब्दांवर विश्वास नाही का ?
वसंता - मी कसं पाठवणार स्वामी ? मला खूप भीती वाटते. प्रथम , मी पात्र लिहीन. तुम्ही ते पत्र घेतलेत तर मी पुस्तके पाठवीन.
स्वामी - तू दे. मी घेईन.
ध्यानाची समाप्ती


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

  श्री साईराम

अम्मांचा गोकुळाष्टमी संदेश

         कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत  मनाचा समतोल राखणे हा गुण म्हणजे अनमोल ठेवा आहे.

-सत्यसाई बाबा


                           
येथे स्वामी म्हणतात की  कोणत्याही परिस्थितीत मनाची शांती ढळू न देणे हा एक अनमोल ठेवा आहे. हा सदगुण जोपासला पाहिजे. श्रीकृष्णाने गीतेमध्ये हाच उपदेश केला आहे. अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण झाल्यामुळे, कृष्णाने युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाला गीतेची शिकवण दिली. वास्तवात, मनुष्याच्या मनात चांगले आणि वाईट याचा सतत संघर्ष सुरू असतो म्हणून आपण मनामध्ये  भाव उद्भवताक्षणीच त्यातील चांगले भाव कोणते आणि वाईट भाव कोणते हे  ओळखले पाहिजे. जो कोणत्याही परिस्थितीत चित्ताचा समतोल  राखू शकतो तो 'स्थितप्रज्ञ' असे कृष्णाने गीतेमध्ये वर्णन केले आहे.
             जो कोणत्याही परिस्थितीत मनाची शांती अबाधित ठेवतो तो स्थितप्रज्ञ होय कारण तो ज्ञानामध्ये दृढतेने प्रस्थापित झालेला असतो.
              जडभरत हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. जडभारत एक महाज्ञानी होता. लोक त्याला मूर्ख समजून नेहमी त्याच्याशी दुर्व्यवहार करत त्याला मारहाण करत. गावातील सर्व लोकं त्याला नोकरासारखे राबवून घेत असत. त्याला लाकडं फोडायला लावत पाणी आणायला लावत.  एवढे काबाडकष्ट केल्यानंतर त्या बदल्यात ते त्याला थोडेसे अन्न देत असत. जरी सर्वजण त्याच्याशी दुर्व्यवहार करत असले तरी त्याचे मन नेहमी शांत असे. लोकांच्या  अशा वागण्याचा त्याच्या मनावर यत्किंचितही परिणाम होतं नसे.ही स्थितप्रज्ञ अवस्था होय.

संदर्भ -  श्री वसंतसाईंच्या सत्संगातून



 
 
जय साईराम