ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
"जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."
११
गुप्तभाव
मी २१ वर्षांची असताना दिंडीगुल येथे राहत होते. माणिवण्णन् आणि कावेरी ही माझी दोन मुले माझ्या आजीबरोबर राहत होती. मोठा मुलगा, अरविंदन् माझ्यासोबत होता. माझा कृष्णाचा शोध सुरू झाला. त्यावेळी मी घराच्या भिंतीवर कृष्णाला पत्रे लिहीत असे. हे मी का केले? मला माहित नाही. प्रथम मी भिंतीवर पत्र लिहिली; त्यानंतर वह्यांमध्ये लिहिली. परमेश्वरास लिहिलेलं पत्र पाठवायचं कुठे? म्हणून, मी वह्यांमध्ये लिहिली. साधारणतः भक्त गाणी आणि कविता लिहितात. या जगात परमेश्वराला पत्रे कोण लिहिते. द्वापारयुगात, रुक्मिणीने कृष्णाला पत्र लिहिले होते. तिचे शिशुपाल बरोबर लग्न ठरवले गेले होते. तिने कृष्णास तिला सोडवण्यास सांगितले आणि एका गुप्त दूतासोबत पत्र पाठवले. कृष्णाने गुप्त रितीने येऊन तिला सोडवले आणि तिच्याशी लग्न केले.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा