ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनामध्ये कधीही न शमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते."
११
गुप्तभाव
मी परमेश्वराला पत्र लिहू लागले. मला माहित नव्हते की माझे त्याच्याशी लग्न झाले आहे. जेव्हा ते पतीच्या देहातून बाहेर पडले तेव्हा मी पत्र लिहायला लागले. स्वामींविषयी कळल्यावर मी त्यांना रोज वहीत पत्र लिहीत असे. दर महिन्याच्या २३ तारखेस मी पत्र लिहून पुट्टपर्तीला पोस्टाने पाठवत असे. स्वामींचा व माझा वाढदिवस २३ तारखेला असतो. मी ही पत्रे पाठवण्यात कधीही खंड पडू दिला नाही. मी का बरे रोज पत्रे लिहिली? लोक सहसा अडचणीत आल्यावरच स्वामींना पत्र लिहितात. मी का बरे स्वामींना रोज पत्र लिहिते? कारण मी माझ्या भावनांचा वर्षाव करते. मी कधीही माझ्या अडचणींविषयी लिहिले नाही. मी रोज लेखनातून भावविश्व व्यक्त करीत असे. तुम्हाला नवल वाटेल की असे काय विशेष भावविश्व ? हे भाव म्हणजे फक्त परमेश्वरापासून अलग झाल्यामुळे होणारा त्याचा ध्यास. माझ्यातून उचंबळून येणारे भाव सहन न झाल्याकारणाने मी निरनिराळ्या प्रकारे लिहून व्यक्त करीत असे. माझं संपूर्ण आयुष्य हे फक्त भावनांचं लिखाण आहे. हे भाव पुस्तकांचे रूप घेतात. जन्मापासून आजमितीपर्यंत परमेश्वरापासूनची ताटातूट आणि त्याचा ध्यास या भावनांची मी लिहित असलेली पुस्तके झाली. हे भाव जग बदलताहेत.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा