रविवार, ११ ऑगस्ट, २०२४


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार 
 

         तपोबल व परमेश्वराप्रती एकाग्र प्रेम, वैश्विक कर्मांचा संहार करून सर्वांना मोक्षपदास घेऊन जात आहे."

११ 

गुप्तभाव

ध्यानात स्वामी म्हणाले:
स्वामी- तुला कोण काय करू शकेल? योग्य वेळ येईल, तेव्हा मी तुला आत बोलवेन आणि तू कोण आहेस हे दाखवेन. तोपर्यंत मला नाही वाटत की दर्शनासाठी तू रांगेत बसावस. हे मला नको आहे. तू माझी शक्ती म्हणून, तुला साजेशा मानाने येशील. तोपर्यंत आपण असं गुप्तपणे भेटणार.
वसंता- यासाठी पुराणात काही पुरावे आहेत का?
स्वामी- त्या सर्वांनी प्रात्यक्षिक केले, आपण आपले भाव दर्शविण्यासाठी आलो आहोत. तू कृष्णाला एवढी पत्रिका लिहिलीस? कोणी कृष्णाला कसे काय पत्र देऊ शकतो? ही कल्पना तुला कशी काय सुचली? तुझ्याप्रमाणे कोणी परमेश्वराला पत्र लिहू शकतात का? हे सर्व अवतार कार्यासाठी घडले. तुझं संपूर्ण आयुष्य म्हणजे फक्त भावनांचां लिखाण होय. आपण हे दाखविण्यासाठी आलो आहोत.
ध्यानाची समाप्ती.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा