ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जादूटोणा, चमत्कार वा मंत्र याद्वारे, प्रेम एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये स्थलांतरीत करता येत नाही."
११
गुप्तभाव
राम, कृष्ण हे अवतार आले तेव्हा त्यांनी कधी सर्वसाधारण माणसांकडून पत्रे घेतली नाहीत. फक्त हाच अवतार सर्वांकडून पत्रे गोळा करतो. हे अतिशय विलक्षण आहे. ही कल्पना त्यांना का बरी सुचली? पूर्वी कोणत्याही अवताराने असे केले नव्हते. जिथे जिथे ते जातात, तिथे दर्शन म्हणजे फक्त पत्रे. रोज दर्शनाचे वेळी हजारो पत्रे, तसेच पोस्टानेही हजारो पत्रे, या अवताराला किती बरे पत्रं? लाखो! करोडो! स्वामींच्या अवतार कार्यात पत्रांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. का बरं? माझे कार्य फक्त पत्रे लिहिण्याचेच आहे का?
मी जवळजवळ ५० वर्षे पत्रे लिहीत आहे. याचा अर्थ ३०*१२*५०=१८,००० पत्रे. मी पुट्टपर्तीला होते तेव्हा एका आठवड्यात स्वामींनी नऊ पत्रे घेतली. हे असे माझे खाते आहे. इतकेच नाही तर माझ्या पुस्तकांचं रोज सुमारे तीन पाने मी लिखाण करीत असते. हे सर्व काही फक्त आमचे भाव असतात. ह्या अवताराच्या कार्यात पत्रांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. यावेळी दूत आणि पत्रे ही अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. द्वापारयुगात, रुक्मिणी आणि तिचे दूत यांच्याद्वारे कृष्णानी पत्रांचे महत्त्व दाखवून दिले. हे असेच आमच्या पुढील अवतारातही चालू राहील का?
* * *
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा