ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनामध्ये कधीही न शमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते."
११
गुप्तभाव
ह्यावेळी स्वामींनी दुसरा दूत पाठवला. या संदेशात मी आणि स्वामी कोण आहोत हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यात म्हटले आहे की मी लिहीत असलेला शब्द न् शब्द हा त्यांचा आहे. स्वामींनी हा संदेश प्रकाशित करण्यास सांगितले. मला भीती वाटली. स्वामींनी या संदेशाची प्रत दूताहस्ते त्यांना देण्यास सांगितले. स्वामींनी तो दर्शनाची वेळी घेतला आणि त्या दूताने विचारले,' अम्मांनी हा संदेश प्रकाशित करावा का?' स्वामी हो म्हणाले.
या दूताने स्वामींना प्रत्यक्षपणे विचारले की मी शिवसूत्र पुस्तकाचे प्रकाशन करावे का आणि मी पुट्टप्रतीला येऊ शकते का? स्वामींनी या नव्या दूताला हो म्हणून सांगितले.
संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा